रामचंद्र सिरस
Indian linguist and author | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९४८ नागपूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल ८, इ.स. २०१० अलीगढ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
| |||
रामचंद्र सिरास (१९४८ – ७ एप्रिल २०१०) हे एक भारतीय भाषातज्ञ आणि लेखक होते. सिरस हे अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयात मराठी साहित्याचे प्राध्यापक होते आणि विश्वविद्यालयातल्या आधुनिक भारतीय भाषा विभागाचे प्रमुख होते.[१] हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला अलिगढ हा चित्रपट सिरस यांच्या आयुष्यावर आधारित आहे.[२][३]
जीवन
भारतातील नागपूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सिरस यांनी नागपूर विद्यापीढातून मानसशास्त्र आणि भाषाशास्त्र यांचा अभ्यास केला. 1985 साली त्यांनी मराठीमध्ये विद्यावाचस्पती(पि.एचड़ी.) तसेच मानसशास्त्रात एम.ए. पूर्ण केले. 1988 साली आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली.[४]
सिरस यांना लहानपणी फ़िट्सचा त्रास होत होता आणि त्याचमुळे त्यांना विवाह न करण्याचा सल्ला दिला गेला होता. जेव्हा हा आजार बरा झाला तेव्हा त्यांचा विवाह करण्यात आला आणि ते जवळपास २० वर्षे वैवाहिक जीवन जगले. शेवटी अनेक वर्षे वेगळे राहिल्या नंतर त्यांनी घटस्फ़ोटाचा निर्णय घेतला.[५]
मराठीमध्ये त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांच्या पाया खालची हिरवळ ह्या कथेसाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २००२चा पुरस्कारही मिळाला होता.[४][६]
१९९६ साली, अलिगढ विद्यापीठाकडून सिरस यांच्यावर एका स्त्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला गेला. हा आरोप खोटा निघाला आणि सिरास यांनी त्यांचे उत्तर देण्या आधीच तक्रार मागे घेण्यात आली होती.[७]
नोकरीवरून काढून टाकले जाणे
८ फेब्रुवारी २०१० रोजी दोन इसमांनी सिरस यांच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरून त्यांना एका पुरुषाबरोबर संभोग करताना पकडले व त्यांचे चित्रण ही केले.[८] ९ फेब्रुवारी २०१०, रोजी सिरस यांना अलिगढ विद्यापीठाच्या प्रशासनाने गैरवर्तवणूकीच्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकले.[९] अलिगढ विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांने असे विधान केले की: "एका रिक्षा ओढणाऱ्या पुरुषाबरोबर सिरस यांना संभोग करताना पकडले गेले होते व त्याचे चलचित्रणही करण्यात आलेले होते. त्यामुळे उप कुलगुरू प्रा. पि.के. अब्दुल अजिज यांच्या आदेशानुसार सिरस यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले आहे".[८]
१ एप्रिल २०१० रोजी सिरस अलिगढ विद्यापीठाने त्यांच्याविरुद्ध केलेला खटला जिंकले आणि त्यांना त्यांची विद्यापीठातील प्राध्यापकाची नोकरी व त्यांचे विद्यापीठातील घर त्यांना परत देण्यात आले.[४][१०] ह्या खटल्याचा केंद्रबिंदू विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी सिरस यांच्या खाजगी जागेत जाऊन सिरस यांची खाजगी जीवनातील घडामोडी चलचित्रात नोंदवणे हा होता. शिवाय सिरस यांना भारतीय दंडविधान कलम ३७७ नुसार गुन्हेगार ठरवणेही शक्य नव्हते कारण ते कलमच मुळात २००९ च्या दिल्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाने असांविधानिक ठरत होते त्यामुळे सिरस यांना निर्दोष जाहिर करून विद्यापीठाला त्यांना त्यांची नोकरी व रहाण्याची जागा परत देण्याचा आदेश देण्यात आला तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी सिरस यांना ह्या त्रासात ओढले होते त्या चलचित्रण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले गेले.[११]
मृत्यू
७ एप्रिल २०१० रोजी सिरस यांचा मृतदेह त्यांच्या घरात संदेहास्पद परिस्थीतीत सापडला.[१२] पोलिसांना आत्महत्या सदृश्य परिस्थीत सापडलेल्या सिरस यांच्या शवाच्या तपासणीमध्ये त्यांना विषबाधा झालेली असल्याचे स्पष्ट दिसून आले,[१३] हत्येचा खटला दाखल करण्यात आला आणि सहा लोकांना त्यांच्या हत्येचा कट करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली.[१४] १९ एप्रिल २०१० रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी असे जाहिर केले की, तीन वार्ताहर आणि अलिगढ विद्यापीठाचे चार अधिकारी सिरस यांच्या हत्येच्या कटात सामील होते. ह्या हत्येबाबत सबळ पुरावे न सापडल्यामुळे हा खटला अर्ध्यातच सोडून देण्यात आला.[१५]
सिरस हे सहा महिन्यांनी निवृत्त होणार होते आणि त्यांची बडतर्फी रद्दबादत ठरवणाऱ्या आदेशाचे पत्र त्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयात पोहोचले.[१०][१५]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "'Gross Misconduct' by Aligarh Muslim University". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 50 (23). 2015-06-05.
- ^ "Hansal Mehta's 'Aligarh' starring Manoj Bajpayee, Rajkummar Rao to open Mumbai Film Festival". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-10-29. 2018-11-22 रोजी पाहिले.
- ^ "Buy cinema tickets for Aligarh | 2015 BFI London Film Festival". रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-10-13. 2018-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ a b c "Gay prof was known as a literary genius - Times of India". The Times of India. 2018-11-22 रोजी पाहिले.
- ^ "Who'll claim Siras' Rs 3cr house? - Times of India". The Times of India. 2018-11-22 रोजी पाहिले.
- ^ "Poetry & Poets in Rags: Poetic Obituaries: [Shrinivas Ramchandra Siras'] biggest achievement was". रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-10-13. 2018-11-22 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ Srivastava, Piyush (2010-02-18). Mail Today.
...the university had charged Siras with sexually harassing a woman in 1996. However, the authorities couldn't substantiate the allegation and withdrew the case even before he could file his reply... The journalists barged into his house, took some shots and escaped before Siras could understand what was happening. A senior member of the university pooled in money from some of the council members and paid the four Rs 20,000 for the two- minute video recording," the source added. AMU spokesperson Rahat Abrar conceded that the four were hired.
Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ a b Pant, Saumya (2010-07-01). Mail Today.
FEBRUARY 9 The videographers - Adil Murtaza and Sirat - forward the footage to AMU authorities, and Siras is fired for " gross misconduct".
Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ . Economic & Political Weekly. 2010-02-27.
The ease with which homosexuality was equated with "gross misconduct" by the AMU underlines the continued existence of a large "homophobic" common sense, which can be put to political use for a variety of unrelated issues, regardless of the well-publicised judgment on Section 377.
Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ a b Buncombe, Andrew (2010-05-28).
Siras had returned to work on Monday, but was due to retire in September. According to a report in the Indian Express, Siras had told the reporter that he wanted to move to the US to teach Marathi and dedicate his life to working for gay rights. "America is the only place I will be free to be gay," he said.
Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ Biswas, Ranjita (2013-12-13). Inter Press Service.
Fortunately, that was in 2010, after the Delhi High Court verdict, and lawyers successfully fought the case in the Allahabad High Court on the premise that he could not be penalised. He was reinstated by the university. The punishment should have been given to those who barged into his private quarters to take photographs illegally.
Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ "Online campaign for justice in gay prof's death". NDTV.com. 2018-11-22 रोजी पाहिले.
- ^ "Gay AMU professor found dead, suicide suspected". NDTV.com. 2018-11-22 रोजी पाहिले.
- ^ "INDIA: Gay professor murdered at top university - University World News". www.universityworldnews.com. 2018-11-22 रोजी पाहिले.
- ^ a b "AMU Prof death: Police say poison traces found in body - Indian Express". www.indianexpress.com (इंग्रजी भाषेत). 2018-11-22 रोजी पाहिले.