भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रातमालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचेकुलगुरू होते. ते विधवाच्या विवाहाचे पुरस्कर्ते होते ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात.
१८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स सह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली. भांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली.
भांडारकरांनी लिहिलेले ग्रंथ
भारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड
मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला "दक्षिण भारताचा इतिहास"
भवभूतीच्या "मालती माधव" वर टीका
फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत व्याकरण भाग १ आणि २
संदर्भ
१. कर्नाटकी, श्री. ना. गुरुवर्य डॉ. भांडारकर ह्यांचे चरित्र, पुणे, १९२७.
२. वैद्य, द्वा. गो. संपा., रा. गो. भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने, मुंबई, १९१९.
३. वैद्य, द्वा. गो. प्रार्थनासमाजाचा इतिहास, मुंबई, १९२७.
राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय
उद्याने आणि प्राणी संग्रहालये
बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क ·संभाजी पार्क· थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान
दवाखाने
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे ·अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे· औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे ·रुबी हॉल क्लिनिक, पुणे· सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे