रामकिंकर बैज
रामकिंकर बैज রামকিঙ্কর বেইজ | |
जन्म | २६ मे १९०६ Bankura, Bengal, British India |
मृत्यू | २ ऑगस्ट, १९८० (वय ७०) P G Hospital, west bengal, india |
राष्ट्रीयत्व | Indian |
कार्यक्षेत्र | Sculptor, painter |
चळवळ | Ashohojog andolon (non-co-operation movement) by Mahatma Gandhi |
प्रसिद्ध कलाकृती | Lady with Dog, Sujata, Santhaal Family, Mill Call, jokkho-jokkhi |
आश्रयदाते | Ramananda Chatterjee |
पुरस्कार | Deshikottom by Visva-Bharati University, D.lit by Rabindra Bharati University, Padma Bhushan(1970) |
वडील | Condicaran Poramanik |
आई | Shompurna Debi |
रामकिंकर बैज (बंगाली लिखाण - রামকিঙ্কর বেইজ)(२६ मे, इ.स. १९०६ - २ ऑगस्ट, इ.स. १९८०) हे भारतातील एक शिल्पकार व चित्रकार होते.
जीवन
रामकिंकर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यात झाला. गावातीलच एका कुंभाराकडे त्यांनी मातीची भांडी आणि पारंपरिक पद्धतीच्या देवादिकांच्या मूर्ती घडविण्याचे प्रारंभिक धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळीसाठी लागणारे प्रचारफलक रंगविण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. वयाच्या पंधराव्या वर्षी रामकिंकर शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. शांतिनिकेतनला भेट देणाऱ्या काही परदेशी शिल्पकारांकडून त्यांनी शिल्पकलेचे थोडे ज्ञान घेतले तसेच पारंपरिक मूर्तिकारांकडूनही काही साधी तंत्रे शिकून घेतली. इ.स. १९३० साली शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठातून शिल्पकलेची पदविका त्यांनी घेतली. त्यानंतर तिथेच त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले व पुढे याच विभागाचे प्रमुखही झाले.[१]
कलाकृती
- इस्रायलमधील हिब्रू विश्वविद्यालयात रविंद्रनाथ टागोरांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांचा रामकिंकर यांनी बनविलेला अर्धपुतळा बसविण्यात आलेला आहे. हा पुतळा भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून इस्रायलला देण्यात आला.[२]
- भारतातल्या आसाम राज्यातील गोहत्तीमधील सरनिया टेकडीवरच्या गांधीमंडप उद्यानातील २० फुटी पुतळा. या पुतळ्याचे उद्घाटन सन १९७०मध्ये झाले.
प्रदर्शन
शिल्पकलेत रामकिंकर यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेली होती. त्यांनी आपल्या शिल्पांची आणि चित्रांची देश-विदेशांत प्रदर्शने भरविली. इ.स. १९४२ साली दिल्लीत, इ.स. १९५० साली पॅरीसमध्ये, इ.स. १९५१ साली टोकियोमध्ये आणि इ.स. १९६० साली शांतिनिकेतनमध्ये त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भरविण्यात आली होती.
रामकिंकर यांच्या बहुसंख्य कलाकृती सध्या दिल्लीच्या राष्ट्रीय कलासंग्रहात ठेवण्यात आलेल्या आहेत.
पुरस्कार व सन्मान
- ललित कला अकादमीचे नियुक्त सदस्य.
- इंडियन स्कल्पचर्स असोसिएशनचे सदस्य.
- पॅरीस येथील `द आलिते नूव्हेल' या संस्थेचे सदस्य.
- पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९७०)
संदर्भ आणि नोंदी
- ^ रामकिंकर बैज. मराठी विश्वकोश. २६ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "इजराइल के विश्वविद्यालय में टैगोर की प्रतिमा का अनावरण". झी न्यूझ (हिंदी भाषेत). २५ जून २०१२. २३ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)