Jump to content

राधाकांत देब

राजा सर राधाकांत देब बहादुर (१० मार्च, १७८४ - १९ एप्रिल, १८६७) हे संस्कृत पंडित आणि कोलकात्यामधील धर्मसभेचे नेते होते. त्यांनी शब्द कल्पद्रुम हा संस्कृत शब्दकोश रचला. त्यांनी ईश्वर चंद्र गुप्त यांच्या संबाद प्रभाकर या नियकालिकात अनेक लेखही लिहिले.[]

देब हे इंग्लिश शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी स्त्रीशिक्षणाचाही पुरस्कार केला. त्यांनी १८५६ च्या हिंदू विधवा पुनर्विवाह कायद्याचा विरोध केला व त्याविरुद्ध सरकारकडे दरखास्त केली होती.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Indrajit Chaudhuri (2012). "Sangbad Prabhakar". In Sirajul Islam and Ahmed A. Jamal (ed.). Banglapedia: National Encyclopedia of Bangladesh (Second ed.). Asiatic Society of Bangladesh.