राणी रासमणी
राणी रासमणी या कोलकात्यातील एक प्रतिथयश व्यक्ती होत्या.[१] कोलकात्यातील जानबाजार परिसरात त्यांचे निवासस्थान होते.
सन १८४७ मध्ये त्यांनी दक्षिणेश्वर (बंगाल) येथे कालीमातेचे मंदिर स्थापन केले. [२] त्या मंदिराचे पुजारी म्हणून श्री रामकृष्ण परमहंस यांनी सेवा केलेली आहे.
जीवन
रासमणी यांचे पती कैलासवासी राजचंद्र यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व मालमत्ता आणि वैभव सांभाळले. त्या ईश्वर परायण होत्या.[३]
संदर्भ
- ^ Saradananda, Swami (2018-02-17). Sri Ramakrishna and His Divine Play (इंग्रजी भाषेत). Vedanta Society of St. Louis. ISBN 9780916356088.
- ^ The Mother (1977). COLLECTED WORKS OF THE MOTHER. 09. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.
- ^ Saradananda, Swami (2018-06-04). श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग - 1 / Sri Ramakrishna Lilaprasanga - 1. Ramakrishna Math, Nagpur. ISBN 9789388083768.