राडीतांडा
राडीतांडा हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गाव आहे. राडीतांडा हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव.गावात अवैध हातभट्टीची दारू तयार करण्याचा व्यवसाय अनेक लोक करतात. पाणलोटक्षेत्रात काम करण्यासाठी काही तरुणांनी दारूचे व्यसन सोडून श्रमदान करण्याची शपथ घेतली.आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.[१] [२]
पार्श्वभूमी
बीड पासून १२४ किलोमीटर अंतरावर आहे.अंबाजोगाई पासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.गावाचे एकूण क्षेत्र २२२४ हेक्टर.१९८ घरं असणारा हा लमाण तांडा [३] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २१३ आहे. त्यातील १०७ पुरुष आणि १०६ महिला आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ९९३ आहे.त्यातील ५२६ पुरुष आणि ४६७ महिला आहेत. [४] गावातील सर्व समाज हा लमाण जनजातीचा आहे.[५]
दुष्काळी परिस्थिती
२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[६] [७] [८] शेतातील नापिकी,शेतकरी आत्महत्या[९], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[१०] राडीतांडा कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[११] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[१२] [१३] [१४] [१५]
दुष्काळाशी दोन हात
गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ स्पर्धेत [१६] गाव सहभागी झाले होते.[१७] पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले.[१८]ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. २० एप्रिल २०१६ पासून गावाने काम करण्यास सुरुवात केली. पुढील ४५ दिवसात श्रमदान व मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला. प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति माणसी ६ घनमीटर श्रमदान झाले. माथा ते पायथा पद्धतीने गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले. क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती, सलग समपातळीतील चर, तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,मातीनाला बांध करण्यात आले.स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले. गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला.[१९] गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न या कामाने सुटला. गावाची निवड महाराष्ट्रातील पहिल्या ९ गावात झाली.[२०]
सामाजिक संस्थांची मदत
या सर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.[२१] [२२] [२३] [२४] [२५] [२६]
बक्षीस
सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ स्पर्धेत गावाला राज्यपातळीवरील तिसरे बक्षीस मिळाले.[२७] [२८] [२९] [३०] [३१]
संदर्भ
- ^ https://www.youtube.com/watch?v=cKygGJZDFG0
- ^ https://www.lokmat.com/maharashtra/dummy-hand-engage-labor/
- ^ https://villageinfo.in/
- ^ https://www.census2011.co.in/
- ^ https://mr.vikaspedia.in/social-welfare/92e93e928935935902936-93693e93894d92494d930/93292e93e923
- ^ "संग्रहित प्रत". 2020-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-14 रोजी पाहिले.
- ^ https://agrostar.in/amp/hi/maharashtra/article/agrostar-information-article-5bf00e3a2e7b8c499bc2a938[permanent dead link]
- ^ https://www.loksatta.com/vishesh-news/drought-in-india-1250439/
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/farmers-sucide/articleshow/48929188.cms
- ^ https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-beed-maharashtra-19936
- ^ http://bepls.com/spl_2017(3)/7.pdf
- ^ https://www.deccanherald.com/content/501207/beed-district-witnesses-large-scale.html
- ^ https://www.dhan.org/developmentmatters/2014/march/case1.php
- ^ https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
- ^ https://sg.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
- ^ "संग्रहित प्रत". 2020-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-14 रोजी पाहिले.
- ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-talukas/
- ^ https://www.paanifoundation.in/samruddh-gaon/training-programme/
- ^ https://www.youtube.com/watch?v=h8yL0Axfdw8
- ^ https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-watercup-competition-final-round-267878
- ^ https://www.youtube.com/watch?v=ffVcUitxSjg
- ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-dnyan-prabodhini-works-to-drought-.html
- ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-drought-IN-Marathwada0898989.html
- ^ https://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/satyamev-jayate-water-cup/?infinitescroll=1
- ^ https://www.pudhari.news/news/Marathwada/Water-Cup-Tournament-start-today/m/[permanent dead link]
- ^ https://www.loksatta.com/lekha-news/paani-foundation-water-cup-2018-1670228/
- ^ https://www.youtube.com/watch?v=VWSDfnIMzTc
- ^ https://www.youtube.com/watch?v=uhpwm72L6cg
- ^ "संग्रहित प्रत". 2021-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-14 रोजी पाहिले.
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/velu-village-is-winer-of-water-cup/articleshow/53713511.cms
- ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-2016-smj-water-cup-winners/