Jump to content

राज कपूर

राज कपूर
[[File:
Радж Капур- встреча в Индии с делегацией узбекских писателей- Самиг Абдукаххар и др, 1950-ые.jpg
|250 px|alt=]]
राज कपूर
जन्मराज कपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

जीवन

राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. जून २ १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूरशशी कपूर हेही चित्रपट अभिनेते होते. त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते. राज कपूर यांना १९८७ साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. राज कपूर चित्रपटाच्या मनोरंजनाआड काहीतरी संदेश देत असत. 'आधी कहानी आधा फसाना' अशी त्यांची शैली होती. सामान्य माणसाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगीतले. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज यांच्या चित्रपटातील नायक हा सामान्य माणूस असायचा. फुटपाथवर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळतात. राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेल एवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर किंवा ढाब्यावर जायचे. त्यामुळे खरीखुरी मंडळी त्यांना भेटायची. त्यांची सुख-दुःखे त्यांना समजायची. त्यांच्या चित्रपटाचा हा प्रेरणास्रोत होता. []

पुरस्कार

राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.

फिल्मफेअर पुरस्कार

  • इ.स. १९८३ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - प्रेम रोग
  • इ.स. १९७२ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - मेरा नाम जोकर
  • इ.स. १९७० - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - मेरा नाम जोकर
  • इ.स. १९६५ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार - संगम
  • इ.स. १९६२ - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार - जिस देश में गंगा बहती है
  • इ.स. १९६० - फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार - अनाडी

चित्रपट

वर्षचित्रपटपात्रनोंद
१९८२गोपीचन्द जासूस
१९८२वकील बाबूवकील माथुर
१९८१नसीब
१९८०अब्दुल्लाअबदुल्ला
१९७८नौकरी
१९७७चॉंदी सोना
१९७६ख़ान दोस्त
१९७५धरम करम
१९७५दो जासूस
१९७३मेरा दोस्त मेरा धर्म
१९७१कल आज और कल
१९७०मेरा नाम जोकर
१९६८सपनों का सौदागरराज कुमार
१९६७एराउन्ड द वर्ल्डराज सिंह
१९६७दीवानाप्यारेलाल
१९६६तीसरी कसम
१९६४संगम
१९६४दूल्हा दुल्हनराज कुमार
१९६३दिल ही तो है
१९६३एक दिल सौ अफ़सानेशेखर
१९६२आशिक
१९६१नज़राना
१९६०जिस देश में गंगा बहती हैराजू
१९६०छलिया
१९६०श्रीमान सत्यवादीविजय
१९५९अनाड़ीराज कुमार
१९५९कन्हैया
१९५९दो उस्ताद
१९५९मैं नशे में हूॅंराम दास खन्ना
१९५९चार दिल चार राहेंगोविन्दा
१९५८परवरिशराजा सिंह
१९५८फिर सुबह होगीराम बाबू
१९५७शारदाशेखर
१९५६जागते रहो
१९५६चोरी चोरी
१९५५श्री ४२०
१९५४बूट पॉलिश
१९५३धुन
१९५३आह
१९५३पापी
१९५२अनहोनीराजकुमार सक्सेना
१९५२अंबरराज
१९५२आशियानाराजू
१९५२बेवफ़ाराज
१९५१आवारा
१९५०सरगम
१९५०भॅंवरा
१९५०बावरे नैनचॉंद
१९५०प्यार
१९५०दास्तानराज
१९५०जान पहचानअनिल
१९४९परिवर्तन
१९४९बरसातप्राण
१९४९सुनहरे दिनप्रेमेन्द्र
१९४९अंदाज़राजन
१९४८अमर प्रेम
१९४८गोपीनाथमोहन
१९४८आग
१९४७नीलकमलमधुसूदन
१९४७चित्तौड़ विजय
१९४७दिल की रानी
१९४७जेल यात्रा
१९४६वाल्मीकि
१९४३गौरी
१९४३हमारी बात
१९३५इन्कलाब

चित्रपट निर्मिती प्रशिक्षण संस्था

राज कपूर यांच्या पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. तेथेच पुण्याची माईर्स एमआयटी ही शिक्षणसंस्था चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था स्थापन करीत आहे. या संस्थेत दिग्दर्शन छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, व संकलन या विषयांचा तीन वर्षांचा, आणि पटकथा लेखन व कला दिग्दर्शन या विषयांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या निर्मितीचाही एक वर्षाचा अभ्यासक्रम तेथे असेल.

चरित्रे

  • राज कपूरच्या मोठ्या मुलीने-ऋतु नंदाने- राज कपूरचे इंग्रजी चरित्र लिहिले आहे. चरित्राचे नाव ThE One and only Shoman असे आहे.
  • राज कपूर : एक कलंदर चित्रसम्राट (अनुवादक - मनजित बावा. मूळ इंग्रजी पुस्तक Raj Kapoor, the Fabulous Showman : An Intimate Biography लेखक - Bunny Reuben)
  1. ^ दैनिक, पुढारी (२ जून २०२०). "व्यक्तिविशेष". १३. २१५: ६.