Jump to content

राजीव पाटील

राजीव पाटील
जन्म २७ मार्च, इ.स. १९७२ []
नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू ३० सप्टेंबर, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन)
भाषामराठी
प्रमुख चित्रपटजोगवा (इ.स. २००९)
सनई-चौघडे (इ.स. २००८)

राजीव पाटील (२७ मार्च, इ.स. १९७२; नाशिक, महाराष्ट्र - ३० सप्टेंबर, इ.स. २०१३; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक होते.

कारकीर्द

राजीव पाटील मूळचे नाशिकचे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते []. नाशकातल्या प्रयोग परिवार या नाट्यसंस्थेच्या नाटकांमधून त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली []. चित्रपटक्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी ते मुंबईस गेले. तेथे त्यांनी अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी या नामवंत दिग्दर्शकांकडे साहाय्यक म्हणून काम केले [].

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषासहभागटिप्पणी
इ.स. २००४सावरखेड एक गावमराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
इ.स. २००८सनई-चौघडेमराठीदिग्दर्शन
इ.स.पांगिरामराठीदिग्दर्शन
इ.स. २००९जोगवामराठीदिग्दर्शनराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
इ.स. २०१३७२ मैल एक प्रवासमराठीदिग्दर्शन
इ.स. २०१३वंशवेलमराठीदिग्दर्शन

मृत्यू

पाटील यांचे वयाच्या ४०व्या वर्षी ३० सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी मुंबईत हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मूळ गावी - नाशिक येथे - त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले [].

अखेरच्या दिवसांमध्ये पाटील "वंशवेल" नावाच्या मराठी चित्रपटावर काम करत होते, जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शीत झाला. [].

संदर्भ व नोंदी

  1. ^ "जोगवा डायरेक्टर राजीव पाटील नो मोर" (इंग्लिश भाषेत). 2013-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन". 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "दिग्दर्शक राजीव पाटील यांचं निधन". २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "दिग्दर्शक राजीव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन". 2013-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "राजीव पाटील यांना अखेरचा निरोप!".

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील राजीव पाटील चे पान (इंग्लिश मजकूर)