Jump to content

राजीव आगाशे

राजीव रामचंद्र आगाशे (मे २४, १९६१ - हयात) हे पुणे, महाराष्ट्र, येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कोलाज-चित्रकार[मराठी शब्द सुचवा] आहेत. भारतात मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, गुलबर्गा अशा शहरातून त्यांची एकल-प्रदर्शने झाली आहेत. थायलॅन्ड, मलेशिया, इन्डोनेशिया, फिलिपिन्स, वियतनाम, श्रीलंका इत्यादी देशातील चित्रप्रदर्शनातही त्यांचा सहभाग आहे. कोलाज व्यतिरिक्त जलरंग, तैलरंग, रांगोळी, कोळसा-कांडी (Charcoal), रंग-कांडी (Crayons) या माध्यमातूनही त्यांनी चित्रे साकारली आहेत. कलासागर, टेल्को परिवार, फायरसाइड (FIRESIDE), न्यु इंडिया डायजेस्ट (NEW INDIA DIGEST) अशा अनेक नियतकालिकांची मुखपृष्ठे व चित्रांची सजावट त्यांनी केली आहे.