Jump to content

राजा परवेझ अश्रफ

राजा परवेझ अश्रफ
जन्म २६ डिसेंबर, इ.स. १९५०
संघर, सिंध, पाकिस्तान
राष्ट्रीयत्वपाकिस्तानी
नागरिकत्वपाकिस्तानी
प्रशिक्षणसंस्था सिंध विद्यापीठ
पेशा राजकारणी
पदवी हुद्दापंतप्रधान
राजकीय पक्ष पाकिस्तान पीपल्ज़ पार्टी
धर्म मुस्लिम

राजा परवेझ अश्रफ (उर्दू, पंजाबी: راجہ پرویز اشرف ; रोमन लिपी: Raja Pervaiz Ashraf) (२६ डिसेंबर, इ.स. १९५०; संघर, सिंध, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी असून पाकिस्तानाचा १७वा व विद्यमान पंतप्रधान आहे. भूतपूर्व पंतप्रधान युसफ रझा गिलानी यास न्यायालय अवमानप्रकरणावरून विधिमंडळ सदस्यत्व व पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे २२ जून, इ.स. २०१२ रोजी[] याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी याने गिलानी मंत्रिमंडळात मार्च, इ.स. २००९ ते फेब्रुवारी इ.स. २०११ या काळादरम्यान जल आणि ऊर्जा खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते []. हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सदस्य आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "राजा परवेझ अशरफ पाकचे नवे पंतप्रधान". 2012-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "भ्रष्ट कारभाराच्या भोवऱ्यातील राजा परवेझ अश्रफ". २०१२-०६-२७ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे