राजस्थानी भाषा
राजस्थानी | |
---|---|
स्थानिक वापर | भारत, पाकिस्तान |
प्रदेश | राजस्थान |
लोकसंख्या | २ कोटी ५ कोटी मारवाडीसह |
भाषाकुळ | इंडो-युरोपीय
|
लिपी | देवनागरी |
भाषा संकेत | |
ISO ६३९-२ | raj |
ISO ६३९-३ | raj (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
राजस्थानी ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली राजस्थानी भाषा प्रामुख्याने भारताच्या राजस्थान राज्यात तसेच पाकिस्तानच्या सिंध व पंजाब प्रांतांमध्ये वापरली जाते. मारवाडी ही भाषा अनेकदा राजस्थानीचीच उपभाषा मानली जाते. मारवाडी व राजस्थानी भाषांचे एकूण ५ कोटी भाषिक आहेत.
गुजरातीप्रमाणे राजस्थानी देखील गुर्जर जमातीच्या लोकांमध्ये विकसित होत गेली. राजस्थानीच्या मेवाडी, शेखावती, बाग्री, मेवती, धुंधरी, हडौती, वागडी इत्यादी अनेक बोली आढळतात.