Jump to content

राजश्री पाथी

राजश्री पाथी (१५ एप्रिल, १९५७:कोईम्बतूर, तमिळ नाडू - ) या भारतीय उद्योजिका आहेत. या राजश्री ग्रुप ऑफ कंपनीझच्या मुख्याधिकारी असून इंडिया डिझाइन फोरमच्या संस्थापिका आहेत. त्यांचा उद्योगांमध्ये साघर, मद्य, विद्युत निर्मिती आणि जैवतंत्रज्ञानाचा समावेश आहे.

कौटुंबिक माहिती

पाथी या पीएसजी ग्रुपचे मालक जी. वरदराज यांची मुलगी होत. त्यांनी लक्ष्मी मिल्सचे मुख्याधिकारी एस. पाथी यांच्याशी लग्न केले.