राजशेखर सोलापुरे
डॉ. राजशेखर शशिकांत सोलापुरे यांचा जन्म लातूर येथे दि. १९ जून १९८० मध्ये झाला. त्यांनी एम.ए. (राज्यशास्त्र), एम. ए. (इतिहास), बी.एड्., बी.जे., एम.फिल., पीएच.डी.(राज्यशास्त्र) पर्यंतचे शिक्षण घेतले. 'महात्मा बसवेश्वरांच्या राजकीय विचार व कार्याची प्रासंगिकता : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर त्यांनी पीएच.डी. पदवीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड कडे शोधप्रबंध सादर केला. मध्ययुगीन भारतीय राजकीय विचार परंपरा व आधुनिक राजकीय विचारपरंपरेचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. भाषण कलेचे भाष्यकार तथा प्रागतिक विचारधारेचे समर्थक असणारे ते व्यासंगी वक्ते व लेखक आहेत. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय संकेतांक 201509101535159233 नुसार दि.०५/०८/२०१५ रोजी त्यांना मुंबईच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य केले.[ संदर्भ हवा ]
स्वलिखित प्रकाशित साहित्य
- 'प्रभावी सूत्रसंचालनाची कला' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २००८)
- 'उत्कृष्ट भाषण कला' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २००९)
- 'भारतीय शासन आणि राजकारण' (अरुणा प्रकाशन, लातूर - २००९)
- 'ग्रामोद्धाराचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २०१०)
- 'सामाजिक कायदा' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१०)
- 'महाराष्ट्र शासन आणि राजकारण', (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१०)
- 'लिंगायत : एक स्वतंत्र धर्म', (प्रवर्तन पब्लिकेशन, लातूर -२०१३)
- 'महाराष्ट्रातील शासन व्यवस्था आणि राजकारण' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१३)
- 'महान विचारांच्या प्रकाशात' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१४)
- 'मानवी हक्क आणि समाज' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१४)
- 'आधुनिकतेचे अग्रदूत : महात्मा बसवेश्वर' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१६)
- 'लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया' (अरुणा प्रकाशन, लातूर -२०१७)
- 'आधुनिक राजकीय विश्लेषण' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१९)
- 'समाजसुधारक सर्वसमावेशक' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१९)
- 'राजकीय संकल्पनांचा परिचय' (सुमन प्रकाशन, लातूर - २०१९)
- 'प्रतिभावंत लोकलेखक अण्णा भाऊ साठे'(विद्याभारती प्रकाशन,लातूर-२०२०)
- 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारक ध्येयवाद'(सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड- २०२२)
संपादित ग्रंथ
- 'बसवेश्वरी वचन साहित्य' (२००७)
- 'महिला विकास : प्रश्न - पैलू - प्रयास' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१२)
- 'परिवर्तनवादी चळवळी' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१४)
- 'राजकीय सिद्धांताची रुपरेषा' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१४)
- 'मानवी हक्क' (२०१०)
- 'महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाड्या आणि भवितव्य' (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१३)
- प्रबोधनाचे प्रेरणास्रोत,(प्रभाकर प्रकाशन, लातूर-२०२४)
संशोधन पत्रिकेचे संपादन
- 'शोध संपदा' या संशोधन त्रैमासिकाचे २०११ पासून संपादक.
सोलापुरे यांची व्याख्याने
- डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यात १९९८ पासून तीन हजारांपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.
प्राप्त पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना 'उत्कृष्ट स्वयंसेवक' राज्य पुरस्कार (इ.स. २००० - २००१)
- नेहरू युवा केंद्र, लातूरचा 'जिल्हा युवा पुरस्कार' (इ.स. २००१ - २००२)
- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील उत्कृष्ट वक्ता पुरस्कार' (इ.स. १९९९-२०००)
- कै. देविदास जमदाडे विचारमंच, लातूरचा 'युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' (२००७)
- स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, लातूरचा 'स्वाभिमानी गौरव पुरस्कार' (२०१०)
- विलासराव देशमुख सार्वजनिक वाचनालय, चांडेश्वर, ता.जि.लातूरचा 'साहित्यरत्न पुरस्कार' (२०१०)
- अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडळ, नागपूरचा 'डॉ. सूर्यकांत घुगरे उत्कृष्ट संशोधक पुरस्कार' (२०१३)
- साईनाथ सांस्कृतिक युवा मंच, लातूरच्या वतीने 'स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार' (२०१४)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार'- 'लिंगायत : एक स्वतंत्र धर्म' या पुस्तकासाठी मिळाला आहे. (२०१२-२०१३)
- चला कवितेच्या बनात, उदगीरचा साहित्य साधना २०१५ हा पुरस्कार 'मानवी हक्क आणि समाज' या पुस्तकासाठी मिळाला आहे.
- अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचा 'हुतात्मा छत्रपती चाैथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार' 'परिवर्तनवादी चळवळी' या संपादित ग्रंथाला मिळाला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार' 'मानवी हक्क आणि समाज' या पुस्तकास मिळाला आहे. (२०१५)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार' 'आधुनिकतेचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर' या पुस्तकास मिळाला आहे. (२०१६)
- महात्मा बसवेश्वर समता परिषद, नांदेडचा 'महात्मा बसवेश्वर समता गौरव पुरस्कार' मिळाला आहे. (२०१७)
- लातूर महानगरपालिकेचा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक पुरस्कार' मिळाला आहे. (२०१९)
- लातूरच्या समर्पित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून राज्यस्तरीय 'समर्पित साहित्यिक पुरस्कार' (२०१९)
- देविदासराव जमदाडे विचारमंच, लातूरचा राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार (२०२०)
- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचा समाजभूषण पुरस्कार
- अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदद्वारे लातूर येथे आयोजित ५ व्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रतिभावंत लोकलेखक अण्णा भाऊ साठे या पुस्तकास 'चरित्र लेखन उत्कृष्ट साहित्य निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार'.
- रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान, उदगीर येथील रंगकर्मी साहित्य आणि सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार.
- रयत प्रतिष्ठान, लातूर कडून 'रयतरत्न महाराष्ट्र भूषण' राज्य पुरस्कार.
- गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ,कौळखेड,उदगीर कडून 'गुरुवर्य' पुरस्कार