राजधानी एक्सप्रेस
राजधानी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची राजधानी नवी दिल्लीला इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात.
इ.स. १९६९ सालापासून सुरू असलेली राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या रेल्वेंपैकी एक मानली जाते. सर्व राजधानी एक्सप्रेस गाड्या जलदगती असून त्यांचे डबे विशेष आरामदायक असतात. सर्व डबे वातानुकुलीत असतात व प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.
मार्ग
सध्या एकूण २२ राजधानी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.
रेल्वे क्रमांक. | रेल्वे नाव | मार्ग | कधी |
---|---|---|---|
12235–12236 | दिब्रुगढ राजधानी | नवी दिल्ली → लखनौ → वाराणसी → मुजफ्फरपूर → समस्तीपूर → गुवाहाटी → दिब्रुगढ | आठवड्यातून एकदा |
12301–12302 | हावडा राजधानी (गया मार्गे) | नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → गया → पारसनाथ → धनबाद → हावडा | आठवड्यातून ६ दिवस |
12305–12306 | हावडा राजधानी (पाटणा रेल्वे स्थानक|पाटणा मार्गे) | नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → पाटणा → जासिदिह → मधुपूर → हावडा | आठवड्यातून एकदा |
12309–12310 | पाटणा राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → पाटणा → राजेंद्र नगर रेल्वे स्थानक | रोज |
12313–12314 | सियालदाह राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया → धनबाद → असनसोल → दुर्गापूर → सियालदाह | रोज |
12423–12424 | दिब्रुगढ टाउन राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → पाटणा → बरौनी → नौगाचिया → कटिहार → गुवाहाटी → दिब्रुगढ | रोज |
12425–12426 | जम्मू तावी राजधानी | नवी दिल्ली → लुधियाना → चक्की → कथुआ → जम्मू तावी | रोज |
12431–12432 | त्रिवंद्रम राजधानी | हजरत निजामुद्दीन → कोटा → वडोदरा → वसई रोड → दिवा → पनवेल → मडगांव → मंगळूर → शोरनूर → एर्नाकुलम → तिरुवनंतपुरम | आठवड्यातून ३ दिवस |
12433–12434 | चेन्नई राजधानी | हजरत निजामुद्दीन → आग्रा → ग्वाल्हेर → झाशी → भोपाळ → नागपूर → वरंगल → विजयवाडा → चेन्नई सेंट्रल | आठवड्यातून २ दिवस |
12435–12436 | दिब्रुगढ टाउन राजधानी | नवी दिल्ली → लखनौ → वाराणसी → हाजीपूर → गुवाहाटी → दिब्रुगढ | आठवड्यातून २ दिवस |
12437–12438 | सिकंदराबाद राजधानी | हजरत निजामुद्दीन → झाशी → भोपाळ → नागपूर → सिकंडराबाद | आठवड्यातून एकदा |
12439–12440 | रांची राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया → बोकारो → रांची | आठवड्यातून २ दिवस |
12441–12442 | बिलासपूर राजधानी | नवी दिल्ली → झाशी → भोपाळ → नागपूर → दुर्ग → रायपूर → बिलासपूर | आठवड्यातून २ दिवस |
12453–12454 | रांची राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → डाल्टनगंज → रांची | आठवड्यातून २ दिवस |
12951–12952 | मुंबई राजधानी | नवी दिल्ली → कोटा → रतलाम → वडोदरा → सुरत → मुंबई सेंट्रल | रोज |
12953–12954 | ऑगस्ट क्रांती राजधानी | हजरत निजामुद्दीन → कोटा → रतलाम → वडोदरा → सुरत → मुंबई सेंट्रल | रोज |
12957–12958 | अहमदाबाद राजधानी | नवी दिल्ली → जयपूर → अजमेर → अबु रोड → पालनपूर → अहमदाबाद | रोज |
22691–22692 | बंगळूर राजधानी | हजरत निजामुद्दीन → झाशी → भोपाळ → नागपूर → सिकंदराबाद → रायचूर → अनंतपूर → बंगळूर | आठवड्यातून ४ दिवस |
22693–22694 | बंगळूर राजधानी | हजरत निजामुद्दीन → झाशी → भोपाळ → नागपूर → सिकंदराबाद → धोन → बंगळूर | आठवड्यातून ३ दिवस |
22811–22812 | भुवनेश्वर राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया →बोकारो → अद्रा → बालेश्वर → कटक → भुवनेश्वर | आठवड्यातून ३ दिवस |
22823–22824 | भुवनेश्वर राजधानी | नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया → बोकारो → टाटानगर → बालेश्वर → कटक → भुवनेश्वर | आठवड्यातून ४ दिवस |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत