राग मल्हार
राग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे.
मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात.
गौड-मल्हार, मिया-मल्हार, मेघ-मल्हार, सूर-मल्हार हे मेघ रागाची छटा असलेले उपप्रकार आहेत.
मल्हार रागात बांधलेली काही गीते
- घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा : गीतकार - ग.दि. माडगूळकर, संगीत - वसंत पवार, स्वर - मन्ना डे, चित्रपट - वरदक्षिणा.
मेघ मल्हार रागात बांधलेली काही हिंदी चित्रपट गीते (गीताचे बोल; चित्रपट; गायक; संगीत दिग्दर्शक या क्रमाने
- कारे कारे बदरा, सुनी सुनी रतिया (मेरा नाम जोकर; आशा भोसले; शंकर जयकिशन)
- तन रंग लो आज, मन रंग लो, बरसो रे (कोहिनूर; लता-रफी; नौशाद)
- दुख भरे दिन बीते रे भैया (मदर इंडिया; आशा, मन्ना डे, रफी, शमशाद बेगम; नौशाद)
- बरसो रे, कारे बादरवॉं पियां पें बरसो (तानसेन; खुर्शीद; खेमचंद प्रकाश)
- लपक झपक से आई बदरवॉं (बूटपॉलिश; मन्ना डे, (मोहंमद रफी]]; शंकर जयकिशन)