राक्षस
"रक्ष रक्षति राक्षस:" अर्थात जे रक्षण करतात त्यांना "राक्षस" म्हणावे
या अर्थी रक्षण करणारा हा नक्कीच ज्यांच्या रक्षण करायचे आहे त्यांच्यापेक्षा बलदंड, विशाल, शूरवीर, आक्रमक, भीतिदायक असाच असला पाहिजे
"राक्षस म्हणजे समाजकंटक, क्रूर, परधन-परस्त्री हडपणारा नव्हे"
आजच्या काळात राक्षस कुणाला म्हणावे?
उदा. राजकीय नेता किंवा प्रसिद्ध व्यक्ती किंवा सिनेअभिनेते यांचे रक्षण करण्यासाठी जे bodyguard किंवा bouncer ठेवले जातात त्यांच्याकडे बघून आपल्याला "राक्षस" कुणाला म्हणावे याची नक्कीच कल्पना येईल
तसेच समाजाचे रक्षण करणारे पोलीस देशाचे रक्षण करणारे जवान हेही "राक्षसच" होत
आपल्या कथापुराणांमधे रक्ष, यक्ष आणि दक्ष यांचा वारंवार उल्लेख दिसतो
रक्ष म्हणजे राक्षस हे वर सांगितल्याप्रमाणे समाजाचे रक्षण करतात
यक्ष हे धनाचे रक्षण करतात (कुबेर)
आणि
दक्ष हे दक्ष असणारे द्वारपालाचे काम करतात हे जवळपास सर्वच मंदिराच्या दारात उभे असलेले आपल्याला दिसतात (जय विजय)
तर मंडळी राक्षसांबद्दल कुठल्याही प्रकारचा दुराग्रह मनात बाळगू नका
शक्य होईल तितक्या सर्वांगाने राक्षसांचा अभ्यास करा
शत्रू राष्ट्राला आपले सैनिक आपले रक्षणकर्ते (राक्षस) हे खलनायकच वाटतात म्हणून आपणच आपल्या नायकांना खलनायक ठरवू नका
राक्षस (Sanskrit: राक्षस, rākṣasa) हा अनिष्ट शक्ति (भूत, पिशाच, राक्षस, इत्यादि), क्रूर, असुरी, अधर्मी, पात्र आहे.
स्त्रीरूपातील राक्षसाला राक्षसी म्हणतात
राक्षस एक अलौकिक कुरूप व्यक्ती आहे, जो धर्म, गूढता, साहित्य, काल्पनिक कथा, पौराणिक कथा आणि लोककथा वगैरे हिंसक साहित्यात आढळतो.
नरक हे राक्षसांचे निवास मानले जाते
धर्मानुसार राक्षसाची नावे खाली दिलेले आहे
राक्षसांची नावे
ख्रिश्चन-सात पापामध्ये कार्य करतो. आध्यात्मिक परमेश्वराच्या विरोधी devil, fiend, evil spirit, fallen angel.
पारशी- अंग्रा मैनयू, Angra Mainyu
इस्लाम- दज्जाल जीन
बौद्ध- Mara (demon)
वैष्णव- कलि (राक्षस)
सात पाप
English | मराठी | हिंदी |
Lust | वासना | |
Gluttony | खादाड | |
Greed | लोभ | |
Sloth | आळस | |
Wrath | क्रोध | |
Envy | मत्सर | |
Pride | अभिमान |
चित्र
- Demon Yakshagana
हे सुद्धा पहा
वेद, पुराण आदि धर्मशास्त्रांमध्ये प्राचीनकालच्या देवता, असुर, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग वगैरे कित्येक मानव जातींचा उल्लेख मिळतो. देवतांची उत्पत्ति अदिति पासून, असुरांची दिति पासून, दानवांची दनु पासून आणि, कद्रू पासून नागांची उत्पत्ती झाली असे मानले जाते.
अदिती, दिती आणि दनू या तिघीही कश्यप ऋषीच्या भार्या होत्या. प्रारंभिक काळात यक्ष आणि रक्ष या दोन्ही मानव जाती होत्या.
राक्षस लोग आधी संरक्षणासाठी नेमले गेले होते. परंतु नंतरच्या काळात त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाल्याने ते स्वतःच्या कर्माने बदनाम झाले. त्यामुळे त्यांनी हल्ली असुर आणि दानव यांच्यासारखे समजले जाते.
पुराणांनुसार कश्यपाच्या सुरसा नावाच्या राणीपासून यातुधान (राक्षस) उत्पन्न झाले. परंतु दुसऱ्या एका कथेनुसार प्रजापिता ब्रह्मा ने समुद्रातल्या पाण्याच्या आणि जलचरांच्या रक्षणासाठी अनेक प्राणी उत्पन्न ककेले. त्यांमध्ये काही प्राण्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतली, त्यांना राक्षस हे नाव पडले. ज्यांनी यक्षण (पूजन) करणे स्वीकारले त्यांना यक्ष म्हणू लागले. समुद्राच्या किनारी क्षेत्रावर पर राक्षस जाततीचे लोक रहात होते.
राक्षसांचे प्रतिनिधित्व दोघां भावांना सोपवले. 'हेति' आणि 'प्रहेति'.दोघेही मधु आणि कैटभ यांच्याइतकेच बलशाली होते. प्रहेति धर्मात्मा होता, तर हेतीला राजकारणात रस होता.