Jump to content

रांजणखळगे

रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

मुठा नदीपात्रात असलेले रांजणखळगे

वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.

रांजणखळगे पुणे जवळ

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्यी सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते.

महाराष्ट्रात रांजणखळगे असलेली ठिकाणे

  • निघोज (सर्वात अधिक प्रसिद्धी मिळालेले अहमदनगर जिल्ह्यातील गाव)
  • सुधागडजवळ दातपाडी नदीतील भांडे राहील असा रांजणखळगा.
  • सुधागड तालुक्यातील नागशेत गावाजवळील वाळणकोंडचे लतकोंडी रांजणखळगे.
  • शेलारवाडी (पुण्यापासून ३० किलोमीटरवर) येथे इंद्रायणी नदीत. नदीचा प्रवाह वाहता रहावा म्हणून नदीच्या पात्रात खोदलेल्या चरांमध्ये हे रांजणखळगे सन १९४०नंतर तयार झाले आहेत. यांचे व्यास २० सेंटिमीटरपासून एक मीटरपर्यंत आहेत. सर्वात मोठा रांजणखळगा ११० X ८० सेंटिमीटर अाकारमानाचा असून तो १२९ सेंटिमीटर खोल आहे. रांजणखळगे असलेले हे क्षेत्र ३५० X २१० मीटर आहे.
  • पुणे कोल्हापूर हायवे (NH4) वरील शेंद्रे या गावापासून 4 किलोमीटर असलेल्या वळसे(जिल्हा सातारा) गावातील उरमोडी नदीमधील रांजणखळगे
  • सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी या ठिकाणी शंभू खडी येथे पांडव घळई (शंभू घळ) आहे त्या ठिकाणी रांजण खळगे आहेत त्यामध्ये कायम पाणी असते.