रसिका जोशी
रसिका जोशी | |
---|---|
जन्म | रसिका जोशी १२ सप्टेंबर, १९७२ मुंबई |
मृत्यू | ७ जुलै, २०११ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पती | गिरीश जोशी |
रसिका जोशी (जन्म : मुंबई, १२ सप्टेंबर १९७२; - वांद्रे-मुंबई, ७ जुलै २०११)) ही मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी यांची ती पत्नी होती. तिच्या अनेक विनोदी भूमिका गाजल्या.
महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला.
कारकीर्द
रसिका जोशी हिच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखन तिने केले होते.
गायब, वास्तुशास्त्र, भूत अंकल, भुलभुलय्या, मालामाल वीकली, जॉनी गद्दार, बिल्लू बार्बर, खलबली या हिंदी भाषेतील चित्रपटांतूनही तिने अभिनय केला. गोपाल वर्माचा 'नॉट ए लव्ह स्टोरी' हा रसिकाचा अखेरचा चित्रपट होय.
मृत्यू
अखेरची तीन वर्षे ती रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होती. जुलै २०११मध्ये व्हाईट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल आले होते[ संदर्भ हवा ]. वयाच्या ३९व्या वर्षी ७ जुलै २०११ रोजी वांद्रे, मुंबई येथे रुग्णालयात तिचा मृत्यू झाला[१].
संदर्भ
- ^ "अभिनेत्री रसिका जोशी यांचे निधन". ८ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रसिका जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)