Jump to content

रससूत्राचे भाष्यकार

भरतापर्यंतच्या रसनिष्पत्तीचा विचार प्रामुख्याने काव्यगत अर्थाचे विभावन/अभिनयन कसे होते या दृष्टीने करण्यात आला. तर भरतानंतरच्या रससूत्राच्या भाष्यकारांनी नाट्यगत रस निष्पन्न होतो म्हणजे वस्तुतः काय होते? तो रसिकांपर्यंत कसा पोहचतो? रसिकाला रसप्रतीती कशाप्रकारे होते? याचा विचार केला आहे यामध्ये भट्टलोल्लट, श्रीशंकुक, भट्टनायक, अभिनवगुप्त यांचे विवेचन महत्त्वाचे आहे.

भट्ट लोल्लट

त्याच्या मते स्थायीभाव हा मूळ काव्यगत पात्रांच्या (राम-सीता) ठिकाणी असतो. नाटकातील विभावादिंनी तो उत्पन्न होतो. अनुभावाने (अभिनय व्यापाराने) तो प्रेक्षकांच्या प्रत्ययाला येतो. तर व्यभिचारीभावांनी त्या स्थायीभावाचा उपचय/ परिपोष होतो. हा उपचित अथवा परिपुष्ट स्थायीभाव म्हणजे रस. उदा.- रंगभूमीवरील पात्रे नाट्यगत राम-सीता / दुष्यंत-शकुंतला यांचे अनुकरण करत असतात. हे अनुकरण इतके परिणामकारक असते की प्रेक्षक नट-नटींनाच दुष्यंत-शकुंतला, राम-सीता मानतात. अर्थात या सादृश्यज्ञानाने ते नटांवरच मूळ पात्रांचा आरोप करतात. त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे लोक दुष्यंत-शकुंतला यांचे प्रेम किंवा राम आणि सीता यांच्या विरहाचे दुःख ते हेच आपले दुःखअशी कल्पना करतात. हे उपचित (परीपुष्ट) प्रेम-दु;ख म्हणजेच रस होय. अर्थात नाट्यकाव्यातील विभावादींचा नायक-नायिकांच्या स्थायीभावाशी संयोग होऊन रसनिष्पत्ती होते. नटांच्या अभिनयातून व्यक्त होणारे भाव आणि नायक-नायिका आदींचे परिपुष्ट स्थायी भाव यांच्यातील सादृश्यामुळे कळून येत नाहीत. नटांच्या अभिनय कौशल्यामुळे हा जो चमत्कार होतो तोच रसिकांच्या आनंदाचे कारण होय.

भट्ट लोल्लटाच्या या मतावर श्रीशंकुकाने आक्षेप घेतला आहे. त्याच्यामते लोल्लटाने स्थायीभाव हे विभावानुभावांऐवजी नाट्यगत पात्रांच्या ठिकाणीच असतात, यावर भर दिला आहे. मात्र भरताच्या रससूत्रात स्थायीभावाचा उल्लेखही नाही. म्हणजेच स्थायीभावाकडून रसाकडे येण्याचा मार्गच भरतमुनींना मान्य नाही. त्यामुळे रस जर काव्यातही नाही आणि नट-नटींमध्येही नाही तर मूळ नायक-नायिका आदींच्या ठिकाणी असलेला रस केवळ सादृश्यामुळे रसिकांपर्यंत कशाप्रकारे येऊ शकेल? असा प्रश्न श्रीशंकुकाने उपस्थित केला आहे

श्रीशंकुक

श्रीशंकुक हा नैय्यायिक पंथाचा अनुयायी होता. हातातील कंकणही आरशात पाहून अनुमानाने सिद्ध करणे हे नैय्यायिकांचे विशेष आहे. विभावादिकांच्या संयोगाने जो स्थायी प्रकट होतो. तो स्थायी म्हणजे दुष्यंतादिकांच्या स्थायीचे अनुकरण असते. रंगभूमीवर विभावानुभावांचा संयोग झाला की नटांनाच लोक राम / दुष्यंत आदी पात्रांच्या ठिकाणी कल्पून त्यांच्या स्थायीचे अनुमान करतो. हे अनुमान सुंदर वस्तूचे असल्यामुळे लोकांच्या मनात आल्हाद निर्माण होतो श्रीशंकुकाच्या मते रसनिष्पत्ती म्हणजे रसाची अनुमिती होय. नाट्यगत पात्रांचे सत्य स्थायीभाव नटांच्या कृत्रिम अभिनयातून कसे प्रकट होतात हे स्पष्ट करताना तो संवादीभ्रमाची संकल्पना मांडतो. यासाठी त्याने चित्रतुरगन्यायाचे उदाहरण दिले आहे. उदा: भिंतीवरील चित्रातील घोडा पाहून माणसाला तो घोडा आहे याचे ज्ञान होते त्यावेळी ते केवळ रंगांचे मिश्रण वाटत नाही त्याचप्रमाणे रंगभूमीवर अभिनय करणारा नटही प्रेक्षकाला राम किंवा दुष्यंत वाटतो. याला संवादीभ्रम असे म्हणतात.

या अभिन्नत्वामुळेच दुष्यंत/राम आदींचे स्थायीभाव नटांच्या ठिकाणी प्रकट होतात. ही प्रतीती मिथ्या असली तरी संवादीभ्रमामुळे लोक त्या स्थायीभावाचे अनुमान करतात. हा अनुमान म्हणजे रस होय. तो नाट्यगत विभाव आणि अनुभावांना लिंग किंवा चिन्ह तर मूळ पात्रांच्या ठिकाणी असलेल्या स्थायीभावांना लिंगी किंवा अनुमेय असे संबोधतो. त्याच्यामते कविवर्णित विभाव आणि नटाने अभिनयाने प्रकट केलेले अनुभाव यावरून स्थायीचे अनुमान करता येते. आणि अशाप्रकारे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारीभाव यांच्या एकत्र येण्याने रसाची निष्पत्ती होते.

मात्र श्रीशंकुकाच्या या मतातही बरेच दोष आहेत. नटांच्या हावभावादी अभिनयाच्या द्वारे मूळ पात्रांच्या चित्तवृत्तींचे अनुकरण आणि अनुमान कसे काय करता येईल? नटाच्या दृष्टीनेही त्याचा अभिनय म्हणजे रामाच्या स्थायीचे अनुकरण नसतेच. तो शिकवलेला अभिनय करत असतो. म्हणजेच तो रामाच्या स्थायीचा नव्हे तर नाट्यगत स्थायीचा अभिनय करत असतो. शिवाय रामादी पात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या चित्तवृत्तींच्या अनुमानाने रसिकांना का आनंद होईल हा प्रश्नही अनुत्तरीतच राहतो.

भट्टनायक

भट्टनायक हा सांख्यमतानुयायी होता. त्याच्यामते जग हे त्रिगुणात्मक आहे.  जीवनातील सुख, दुःख हे भाव वास्तुमात्रातील सत्त्व, रज, तम या गुणांच्या कमी-अधिक प्रमाणावर अवलंबून असते. काव्य वा नाट्यातील वर्णनांनी अगर देखाव्यांनी रसिकांच्या मनात सत्त्व गुणांचा उद्रेक होतो. त्यामुळे आनंदाची प्रतीती येते. येथे भट्टनायकाने प्रथमच रसनिष्पत्तीचा रसिकांच्या अंतःकरणाशी संबंध जोडला आहे. भट्टलोल्लटाच्या विचारांचे खंडन करताना तो म्हणतो, विशिष्ट कार्याची उत्पत्ती कारणाशिवाय होऊ शकत नाही. काव्यनाट्यातील कारणे खरी नसतात म्हणूनच त्यांना विभाव असे म्हणतात. मग कल्पित कारणांनी खऱ्या पात्रांच्या ठिकाणी रस कसा काय निर्माण होऊ शकेल? त्याला श्रीशंकुकाचा अनुमितीवादही मान्य नाही. काव्यातील नायक-नायिकांच्या अर्थात परगत स्थायीभावाचा आस्वाद रसिकाला कसा आनंददायक होईल?  असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.

रसनिष्पत्तीचा आपला विचार मांडताना त्याने शब्दांच्या ठिकाणी अभिदा, भावना आणि भोगीकरण या तीन शक्ती मानल्या आहेत. अभिदेने नाट्यकाव्याचा वाच्यार्थ समजतो. भावकत्वाने नाट्यातील व्यक्तीचे साधारणीकरण होते. त्यामुळे नाट्यगत पात्रांचे सर्वसामान्य स्त्री-पुरुषांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे त्यांच्या भावांचा आस्वाद सामान्य प्रेक्षक घेऊ शकतो. अशावेळी दुष्यंत आणि शकुंतलेचे प्रेम हे केवळ त्या काव्यनाट्यगत पात्रांमधील प्रेम न राहता केवळ स्त्री आणि पुरुष यांमधील प्रेम बनते. त्यातील गुणालंकारयुक्त शब्दयोजनेमुळे आणि विभावादींच्या अलौकिकत्वामुळे अभिव्यक्त होणारा भाव हा व्यक्तीसंबद्ध राहत नाही. त्याला स्थळ-काळ-व्यक्तिनिरपेक्ष शुद्ध भावाचे म्हणजे  विश्वात्मक भावाचे स्वरूप आलेले असते. हेच साधारणीकरण होय. यामुळेच रसिक काव्य-नाट्यातील विविध भावनांचा आस्वाद घेऊ शकतात. हाच भट्टनायकाचा भोगीकरण व्यापार होय. अर्थात विभावादींच्या साधारणीकरणातून प्रकट होणारा स्थायीभावही रसिकांना साधारण्याच्या पातळीवरून प्रतीत होत असतो. म्हणजेच कवीकौशल्यामुळे काव्यार्थ भावित होतो. यावेळी रसिक अलौकिक पातळीवर आलेला असल्यामुळे त्याच्याठिकाणी सत्त्व गुणांचा उद्रेक होतो. त्यामुळे काव्य-नाटकांपासून रसिकाला आनंद होतो. यालाच भट्टनायकाने रसनिष्पत्ती असे म्हणले आहे.

अभिनवगुप्त

अभिनवगुप्ताने भट्टनायकाचे भावकत्व अर्थात साधारणीकरणाचे तत्त्व मान्य केले आहे. मात्र त्याने भावकत्व नावाचा स्वतंत्र व्यापार न मानता व्यंजनाव्यापारामुळेच भावांचे साधारणीकरण होते हे मत स्वीकारले. त्याने भट्टनायकाची भोगीकरणाची प्रक्रियाही अनावश्यक ठरवली. त्याने रसाला स्थायी विलक्षण असे ठरवत असतानाच रसिकाची आस्वाद प्रक्रिया ही व्यंजनाव्यापारातच अनुस्यूत असते हे दाखवून दिले. त्याने कोणत्याही साभिप्राय विधानाची प्रतीती तीन अवस्थांतून येते असे सांगितले. उदा: ‘आरोग्यम् प्राप्तवान् सांबः स्तुत्वा देवं अहर्पतिम् |’ यामध्ये सांबाने सूर्याची स्तुती केली आणि त्याला आरोग्य प्राप्त झाले. या वरील वाक्याचा वाच्यार्थ होय. हा वाच्यार्थ सांब नावाच्या व्यक्तीशी संबंधित आहे.  यावरून कोणत्याही व्यक्तीने सूर्यस्तवन केल्यास त्याला आरोग्य प्राप्ती होऊ शकते हा सामान्य अर्थ लक्षात येतो. आणि शेवटी सूर्यस्तवन केल्यास आरोग्यप्राप्ती होऊ शकेल असा आत्मानुप्रवेशी विचार मनात येतो. अशाप्रकारे व्यंजनाव्यापारानुसार वरील विधानाची प्रतीती आधी व्यक्तिविशिष्ट ज्ञान, त्यानंतर साधारण्याच्या पातळीवरून होणारे व्यक्तिनिरपेक्ष ज्ञान आणि शेवटी आत्मानुप्रवेश या अवस्थांमधून होते.

काव्यातील कवीच्या कौशल्यामुळे ही प्रक्रिया अधिक उत्कटपणे घडून येते. काव्यनाटकांमध्ये विभावादींच्या योगे व्यक्त होणारा स्थायीभाव प्रारंभी जरी व्यक्तीसंबद्ध असला तरी व्यंजनेने व कविकौशल्यामुळे त्याचे तत्काळ साधारणीकरण होते. नाट्यातील पात्रांची व्यक्तीसंबद्धता गळून पडते व त्यांना सामान्य स्त्री-पुरुषांचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्या अभिनयातील भाव हे कृत्रिम न राहता त्यांना मानवी भावनांचे रूप घेतात. विभावादिकांनी अभिव्यक्त झालेला आणि साधारण्याच्या पातळीवरून प्रत्ययाला येणारा हा स्थायीभाव रसिकाच्या ठिकाणी असलेल्या वासनारूपी स्थायीभावांशी संवादी असल्याने रसिकाचा त्यामध्ये अनुप्रवेश घडून येऊन त्याच्यासाठी तो आस्वाद्य होतो. रसिक त्याच्याठायी असलेल्या अभिव्यंजनेच्या सामर्थ्यामुळे नाट्यगत भावांशी, काव्यार्थाशी तन्मय पावतो. त्याच्या जाणिवेत अलौकिक अशा विभावादिकांनी व्यक्त केलेल्या अलौकिक स्थायीची चर्वणा सुरू होते. यालाच अभिनवगुप्ताने रस प्रतीती असे म्हणले आहे. ही चर्वणा संपली की निर्माण होणारा रसास्वादही नाहीसा होतो. मात्र हा रसास्वाद घेत असताना रसिकांच्या मनाला शांती मिळते. म्हणूनच अभिनवगुप्ताने रसप्रतीतीस विश्रांतीकारिणी प्रतीती असे म्हणले आहे. अभिनवगुप्ताचा रसनिष्पत्तीविषयक विचार आकृतीद्वारे पुढीलप्रकारे स्पष्ट करता येतो.[][][]

रससूत्रावर अनेक विद्वान, पंडित, अभ्यासक,संशोधकांनी भाष्य केले आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र म्हणजेच आदि ग्रंथ मानला जातो., भरतमुनी यांनी नाट्यशास्त्रातील नमूद केलेल्या तत्त्वांचे विश्लेषण प्रामुख्याने रससिद्धान्त, अभिनय सिद्धान्त आणि रूपक वेगळेपण मांडले आहे. रस सिद्धान्त हे भारतीय विचार परंपरेतील सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. या सिद्धांताचे प्रणेते भरतमुनी नाट्यशास्त्रातच रसांविषयी प्रथम चर्चा करणारे मानले जातात. तथापि, नाट्यशास्त्राच्या प्रथेवरून हे माहित आहे की भरत मुनिच्या अगोदरही रसाची परंपरा होती. त्याचा स्पष्ट उल्लेख आहे की त्याच्या आधी दुहीन व वासुकी नावाचे दोन आचार्य होते. दुहीन यांनी रसांची संख्या आठ असल्याचे मानले तर वासुकीने शांत नावाच्या नवव्या रसाचादेखील विचार केला. भरताने दुहीनची परंपरा पुढे नेली आणि आठ रास समजावून सांगितले. अभिनवगुप्त, वासुकीने प्रस्तावित केलेला शांती रास यांनी मान्य केलेला नववा रस सादर केला. या आधारे रस भारतीय कला चिंतनात कधी आणि कसा सामील झाला हे सांगणे अशक्य आहे. याचा उपलब्ध पुरावा म्हणजे नाट्यशास्त्र. ते सांगते की त्यापूर्वी रसविषयक चर्चा होती. आणि त्यानंतरही पुढील काळापर्यंत रस हा चर्चेचा विषय राहिला आहे. मुळात रस हा भारतीय कला चिंतन करणाऱ्याचा प्रकार आहे. पाश्चात्त्य अभिवचनांचा प्रभाव असल्यामुळे बरेच नवीन सिद्धान्त नंतरच्या अनेक विद्वानांनी स्वीकारले, परंतु रस सिदन्धांत दुय्यम नव्हता. हे तत्त्व मूलतः भरतमुनी यांनी नाटक, किंवा रूपकासाठी किंवा आजच्या संदर्भात नाटकासाठी दिले होते. परंतु नंतर असे दिसून येते की त्याचा प्रसार ऑडिओ-व्हिज्युअलपासून ते संगीत आणि चित्रकला या काळात आहे. या कारणास्तव या सिद्धांताचे वैज्ञानिकत्व आहे. ज्याची तार्किक आधारावर विविध विद्वानांनी तपासणी केली आहे. या सिद्धांताशी समांतर, अ‍ॅरिस्टॉटलचा कॅथारसिस किंवा कॅथारिसिस सिद्धान्त असा मानला जातो की अरस्तूचे तत्त्वज्ञान ज्याच्या संकल्पनेचा आधार आहे परंतु ते सिद्धान्त केवळ दुःखाविषयीच बोलते. विनोदांसारख्या सुंदर भावनेची आणि योगायोगासारख्या कोमल भावनेची कल्पनाही नाही, तर रस सिद्धान्त त्याच्या आवरणात सर्व प्रकारच्या भावना बाळगतो. म्हणून रस सिद्धान्त याला कॅथरासिस सिद्धांतापेक्षा अधिक वैज्ञानिक म्हणता येईल. तथापि, दोन प्राचीन आचार्य, भट्ट नायक आणि भट्ट लोल्लट यांनी भरताच्या रस सिद्धांताच्या स्पष्टीकरणाची तुलनात्मक चर्चा केल्याचे सांगितले गेले आहे.

भरतमुनी यांनी सातव्या अध्यायात नाट्यशास्त्र आणि सहाव्या अध्यायात रसाचे विस्तृत वर्णन केले आहे. रसाचा साधा अर्थ आनंद आहे. तो विविध अभिव्यक्त्यांवर आधारित आहे .परंतु त्याला त्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी अर्थ प्राप्त होतो. नाट्य प्रयोगात प्रेक्षकांना हा आनंद कसा मिळतो, या संदर्भात भरत यांनी नाट्यशास्त्राच्या सहाव्या अध्यायात एक सूत्र दिलेले आहे. भाव भावनांच्या संयोगामुळे रस निष्कर्ष निघतो. या सूत्रामध्ये भरताने वेगवेगळ्या अभिव्यक्तींच्या मिश्रणाने रस निष्पत्ती विषयी सांगितले, परंतु ते कसे होते; प्रेक्षकामध्ये किंवा अभिनेत्यांमध्ये किंवा पात्रांमध्ये रस कसा निर्माण होतो आहे. याचा उल्लेख केला जात नाही. याखेरीज भरतमुनींनी रस हा आधार कायमस्वरूपी मानला पण रससूत्रामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. या अस्पष्टतेमुळे, भरतमुनी नंतरच्या अनेक विद्वानांनी त्यांच्या युक्तिवाद आणि तत्त्वज्ञानाचा अवलंब करून हे सूत्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या पंडितांमध्ये चार विद्वानांचे मत मानले जाते. पहिले भट्ट लोल्लट. त्यांचे मत मोलाचे समजले मानले जाते. दुसरे भाष्यकार श्री.शंकुक आहेत, त्यांचे मतही निर्विवाद म्हणून ओळखले जाते. तिसरे भाष्यकार भट्टनायक आहेत, त्यांचे मतही प्रसिद्ध आहे. चौथे आणि शेवटचे भाष्यकार म्हणजे अभिनवगुप्त, त्यांचे मत अभिव्यक्तिवाद असे मानले जाते. अभिनवगुप्त यांचे मत आजपर्यंतचे सर्वात स्वीकारलेले मत आहे. परंतु अभिनवगुप्त यांनी हे उत्स्फूर्तपणे स्पष्ट केले नाही, परंतु भट्ट लोल्लट, श्री शंकुक आणि भट्ट नायक यांच्या मतांवर आधारित त्यांनी अनुभवात्मक तत्त्वज्ञानाचा वापर करून रस सिद्धांताचे प्रमाणित वर्णन केले आहे. वस्तुतः अभिनवगुप्तांपूर्वी तिन्ही विद्वानांनी रस सिद्धांताच्या प्रमाणित व्याख्याच्या दिशेने एक पाऊल उचलले होते. म्हणून, प्रत्येक विद्वानांचे मत महत्त्वाचे मानले जाते.

रससूत्रात नमूद केलेल्या व संबंधित श्लोकांत याचा परिचय मिळेल कारण या अभिवचनांच्या संदर्भात या मतांचा उल्लेख केला आहे. आपण अभिव्यक्तीच्या प्रकारापूर्वी अभिव्यक्तींविषयी बोलतो. भावना नक्की काय आहे? मनातील भाव किंवा थेट बोलणे म्हणजे विचार. अनुभूतीद्वारे व्यक्त होणे, म्हणून त्याला अभिव्यक्ती म्हणतात. व्यक्त करणे या क्रियापदाचा व्यावहारिक अर्थ जाणवणे होय.

"रूपक":- वेगळेपणाच्या आधारे नाट्यशास्त्राचे भाष्य आणि दृश्यात्मक करण्याची प्रक्रिया"

भारतात पुरातन काळापासून नाटकांचे मंचन करण्याची तसेच परंपरा लिपी लिहिण्याची परंपरा आहे. आतापर्यंत ज्ञात असलेले सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे नाट्यशास्त्र, ज्याची निर्मिती दुसऱ्या शतकात समजली जाते. भरतच्या अगोदरही शास्त्र लिहिण्याची परंपरा होती अशी नाट्यशास्त्रावरून माहिती मिळते. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी, क्रिश्श्व आणि शिलांनी नटसूत्रांची निर्मिती केली आहे. वाचस्पती गैरोला यांनी लिहिले आहे, "नाट्यशास्त्र हा मूळ स्रोत, वैदिक युगातच निर्माण झाला होता आणि इतर वैदिक शाखांइतकाच त्यांना सार्वजनिक आदर मिळाला होता ... या संदर्भात विद्वानांची श्रद्धा आहे की नीतीसूत्र चरकातील अग्निवेशच्या आयुर्वेदिक प्रणालीप्रमाणेच या शास्त्राचा नाट्यशास्त्रात समावेश करण्यात आला होता . शिलाली आणि कृषेश्व्याव्यतिरिक्त नाट्यशास्त्र्यांनी आणि त्यांच्या सिद्धांतांवर नाट्यशास्त्रामध्ये किंवा त्याच्या नंतरच्या अभिनव भारती, दशरूपक, भावप्रकाश इत्यादी ग्रंथांमध्ये चर्चा केली आहे. हे तत्त्व शिलाली आणि कृष्णाच्या नटसूत्रांप्रमाणेच नाट्यशास्त्रात विलीन झाले आहेत. या गोष्टींवरून हे स्पष्ट झाले आहे की नाट्यशास्त्रातील विशालतेच्या आधारावर भरतच्या मूलभूत तत्त्वांच्या व्यतिरिक्त, विविध नाट्याचार्यांच्या तत्त्वांचेही योगदान आहे. जे एकतर भरतचे किंवा त्यांच्या समकालीनांचे पूर्ववर्ती होते. ज्याप्रमाणे भरताच्या नाट्याचार्यच्या पूर्ववर्तींची तत्त्वे नाट्यशास्त्रात विलीन झाली .तशीच भरताच्या नंतरच्या विद्वानांनी नाट्यशास्त्राचा उल्लेख म्हणून भाष्य केले. या निर्मात्यांपैकी कोहल, तुंबारू, दातील, मातंग, कात्यायन, राहुल, उदभट्ट, लोल्लट, शंकुक, भट्टनायक, भट्टयंत्र, कीर्तिधर, मातृगुप्त, सुबंधु, अश्माकुट, वद्रयान, शतकर्णी आणि नख्तकट्टा या नामवंत निर्मात्यांमध्ये उल्लेखनीय आहे. यापैकी कोणत्याही पंडिताची रचना उपलब्ध नाही. केवळ कोहल आणि सुबंधुची रचना अभिनवभारती आणि संगीतकारांकडून येते, अनुक्रमे कोहलप्रदशिक आणि नाट्यपरख्याची माहिती मिळते. प्राप्त झालेले मुख्य भाष्य म्हणजेः अभिनवगुप्त, अभिनवभारती, नंदिकेश्वरची अभिनय दर्पण, धनंजयचा दशरूपक आणि धानिकचा अवलोक, वर्थ्य, सागरानंदीचा नाट्यलक्षणा-रत्नाकोश, शारदान्यचा भावप्रकाशन, रामचंद्र-गुणभद्र, नाट्यदर्पणसूत्र, कवननुशासन यांनी केलेले रावणवसुधाकर, सिंह भुपाला, साहित्यदर्पण यांनी विश्वनाथ कविराज, शारंग देवकृत संगीतकरण, अशोकमलकृत नृत्याध्यायी इ. काही विद्वान उपरोक्त काही ग्रंथ मूळ ग्रंथ मानतात. नाट्यशास्त्राच्या भाष्यांत, मुख्यतः रूपकांचे स्पष्टीकरण देणाऱ्या ग्रंथांतील पहिले नाव म्हणजे धनंजयाचा दशरूपक.

प्राचीन काळातील धारा, मध्य प्रदेशातील धार येथील रहिवासी दशरूपककार धनंजय. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचे कार्य आहे. या आधारे ते मुंजराजचे पीठासीन अधिकारी होते. म्हणून असे मानले जाते की मंडप दहाव्या शतकातील काम आहे. आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी म्हणतात, "भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या विसाव्या अध्यायाला 'दशरूप-वाकलन' किंवा 'दशरूप-विधान' म्हणले गेले आहे. या आधारे, धनंजयाने त्यांच्या 'दशरूपक' पुस्तकाचे नाव दिले आहे. दर्शनपकाच्या दुसऱ्या श्लोकात धनंजयाने विष्णूच्या दहा अवतारांना रूपकाची रूपक दिली आहेत. प्रकाश नावाच्या या पुस्तकाच्या चार अध्यायांमध्ये केवळ रूपकच नाही तर नायक-नायिका वेगळेपण आणि रस यांचे वर्णन केले आहे. दशरपकाची रचना पाहिल्यास असे दिसते की धनंजयाने नाट्यशास्त्राच्या विशालतेचे प्रमाण जास्त केले आहे. पहिल्या प्रकाशातील सहाव्या श्लोकात त्याने स्वतःचे समर्थन केले आहे.

म्हणजेच भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र तपशीलवार लिहिलेले आहे. रूपक रचनांशी संबंधित गोष्टी येथे आणि तेथे विखुरलेल्या आहेत. म्हणूनच, कमी बुद्धिमत्ता असलेल्या लोकांसाठी भ्रम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सामान्य लोकांसाठी मी हे नाट्यवेदातील शब्द आणि अर्थ सोप्या पद्धतीने हे पुस्तक लिहित आहे असे वर्णन आढळतात.

आचार्य धनंजयांनी प्रथम प्रकाशात गणेश वंदना केली आहे, त्यानंतर विष्णू आणि भरत, त्यानंतर सरस्वतीची कृपा आणि नंतर नाट्यशास्त्राचे शास्त्रीय महत्त्व आणि पार्वती आणि शिव यांचे वर्णन अनुक्रमे लास्य आणि तांडव या योगाची चर्चा आहे. त्यानंतर त्यांनी वरील श्लोक लिहिले आहेत.

सातव्या श्लोकात, त्याने म्हणले आहे की, रंगमंचावरील अनुकरणाला दृश्यामुळे रूपक म्हणतात. दहा प्रकारचे रूपक आहेत. येथे आरोप आणि स्वभाव सूचित करतात की अभिनेत्यावर अनुक्रमे रसाचे पात्र आणि प्राथमिकता आहे. आठव्या श्लोकात रूपक, नाटक, भान, प्रकरण, प्रहसन, डीम, व्यायोग, संवाद, विथी, अंक आणि इहामृग या दहा भेदांचे वर्णन केले आहे. नाट्यात वक्तृत्व आहे तर नृत्य हे ताल-लय आधारित अवयव-विक्षेपण आहे.रूपकामध्ये भेदाचा आधार घेऊन मांडणी केली आहे.

भरतमुनीवरील अन्य मराठी पुस्तके

  • भरतरंग-भरतमुनींनी नाट्यशास्त्रात मांडलेल्या रंग या संकल्पनेचा सर्वांगीण विचार (कल्याणी हर्डीकर)

संदर्भ :

  1. . नाट्यशास्त्र की परंपरा और दशरूपक,
      हजारीप्रसाद द्विवेदी, पृथ्वीनाथ द्विवेदी।
  1. . भारतीय नाट्य परंपरा और अभिनयदर्पण,
      वाचस्पति गैरला।
  1. . हिंदी आलोचना की पारिभाषिक
      शब्दावली, डॉ॰ अमरनाथ।
  1. . भारतीय और पाश्चात्य नाट्य सिद्धान्त,
      डॉ॰ विश्वनाथ मिश्रा।
  1. . सौन्दर्यशास्त्र, डॉ॰ ममता चतुर्वेदी।
  2. . हिंदी नाट्यशास्त्र, बाबूलाल शुक्ल शास्त्री।
  3. . नाट्यशास्त्र का इतिहास, डॉ॰ पारसनाथ
        द्विवेदी
  1. ^ गाडगीळ स. रा. : काव्यशास्त्रप्रदीप
  2. ^ जोग रा. श्री. : अभिनव काव्यप्रकाश
  3. ^ पाटणकर वसंत : साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या