रश्मी ठाकरे
रश्मी ठाकरे | |
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी | |
विद्यमान | |
पदग्रहण २८ नोव्हेंबर २०१९ | |
विद्यमान | |
पदग्रहण २०२० | |
मागील | उद्धव ठाकरे |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | शिवसेना |
वडील | माधव पाटणकर |
पती | उद्धव ठाकरे (ल. १९८९) |
अपत्ये | आदित्य, तेजस |
शिक्षण | वाणिज्य शाखेतील पदवीधर |
गुरुकुल | व्हीजी वाझे महाविद्यालय |
व्यवसाय | संपादक |
धर्म | हिंदू |
रश्मी ठाकरे (पूर्वाश्रमीच्या पाटणकर) या एक भारतीय पत्रकार आहेत. त्या सामना आणि मार्मिकच्या संपादक आहेत. त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आहेत.[३]
प्रारंभिक जीवन आणि कुटुंब
रश्मीचा जन्म माधव पाटणकर यांच्या पोटी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पाटणकर हे डोंबिवली उपनगरात स्वतःचा कौटुंबिक व्यवसाय चालवतात. रश्मी यांनी मुलुंडमधील व्हीजी वाझे महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. इस १९८७ मध्ये त्या भारतीय आयुर्विमा महामंडळात कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. तेथे श्रीकांत ठाकरे यांची मुलगी तथा, राज ठाकरे यांची बहीण जयवंती सोबत रश्मीची मैत्री झाली. जयवंतीच्या माध्यमातून त्यांची उद्धव ठाकरे सोबत ओळख झाली आणि या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या काळात उद्धव ठाकरे हे फोटोग्राफी करत असत आणि त्यांची जाहिरातीची कंपनी होती. नंतर १९८९ मध्ये या जोडप्याचा विवाह झाला.[३][४][५][६] या जोडप्याला आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे अशी दोन मुले आहेत. पैकी आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय असून तेजस ठाकरे हे वन्यजीव संशोधक आहेत.[७]
कारकीर्द
उद्धव यांच्याशी लग्न केल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. हा पेपर बाळ ठाकरे यांनी १९८२ मध्ये सुरू केला होता आणि ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १७ नोव्हेंबर २०१२ पर्यंत संपादक होते. २०१९ मध्ये शिवसेनेने सरकार स्थापन केले तेव्हाही रश्मी ठाकरे सक्रिय दिसल्या होत्या. त्यावेळी आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यावेळीही त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली होती.[३]
संदर्भ
- ^ Chaitanya Marpakwar (2 March 2020). "Rashmi Thackeray takes over as Saamana editor". Mumbai Mirror. 16 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "After Saamana, Maharashtra CM's Wife Rashmi Thackeray Named Editor of Marmik Too". News18. 4 March 2020. 16 March 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c "LIC में नौकरी करते हुए ठाकरे परिवार से मिली थीं रश्मि, फिर उद्धव ठाकरे से की शादी… अब महाराष्ट्र के संग्राम में संभाला मोर्चा". to hindi.com (हिंदी भाषेत). २७ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Rashmi Thackeray: Behind Uddhav Thackeray's success a woman". The Times of India. 28 November 2019. 16 March 2020 रोजी पाहिले.
- ^ Kiran Tare (5 March 2020). "The rise and rise of Rashmi Thackeray". India Today. 16 March 2020 रोजी पाहिले.
- ^ Vishwas Waghmode (8 March 2020). "Rashmi Thackeray: Mrs Surefire". The Indian Express. 16 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "Uddhav May Shift to New House After LS Elections". Indian Express. Mumbai. 9 April 2014. 2014-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2014 रोजी पाहिले.