Jump to content

रवी परांजपे

रवी परांजपे

जन्म९ ऑक्टोबर १९३५
बेळगांव
मृत्यू११ जून २०२२
पुणे
कार्यक्षेत्रचित्रकला

रवी परांजपे (९ ऑक्टोबर १९३५ बेळगाव - ११ जून २०२२ [] पुणे ) हे चित्रकार, बोधचित्रकार होते. ते भारतीय चित्रकला शैलीत चित्र काढत असत. त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. नंतर त्यांनी नैरोबी, केन्यामध्ये काम केले.

परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे.

पुस्तके

  • नीलधवल ध्वजाखाली (लेखसंग्रह)
  • ब्रश मायलेज (आत्मकथन)
  • शिखरे रंग रेषांची (परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ)

सन्मान आणि पुरस्कार

  • द बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर हा जीवनगौरव पुरस्कार (२०२२) []
  • ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार []
  • ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२)
  • दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार []
  • शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन". Loksatta. 2022-06-13 रोजी पाहिले.
  2. ^ a b "ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन". eSakal - Marathi Newspaper. 2022-06-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे