Jump to content

रवींद्र साठे

रवींद्र साठे

रवींद्र साठे
टोपणनावे रवींद्र
आयुष्य
जन्म ७ फेब्रुवारी १९५१
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

रवींद्र साठे (जन्म : ७ फेब्रुवारी १९५१) हे मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक आहेत.

शिक्षण

रवींद्र साठे यांनी शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे शिक्षण श्री.मुकुंदराव गोखले यांच्याकडे घेतले. पुढे पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले.फिल्म इन्स्टीटयूट, पुणे येथे त्यांनी साऊंड रेकॉर्डीस्ट होण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.[]

संगीत क्षेत्रातील काम

साठे यांनी मुंबई दूरदर्शन येथे साऊंड रेकॉर्डीस्ट पदावर काम केले.

घाशीराम कोतवाल नाटकात त्यांनी केलेली गायक नटाची भूमिका विशेष गाजली.

पार्श्वगायन केलेले चित्रपट

रवींद्र साठे यांना मिळालेले पुरस्कार

  • स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेचा इ.स. २००१चा माणिक वर्मा पुरस्कार
  • पहिला शाहीर साबळे पुरस्कार (२०१५)
  • पी. सावळाराम पुरस्कार[] (२०१८)
  • `पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं' या जैत रे जैत चित्रपटातील गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव १९७८
  • याशिवाय पार्श्वगायनाचे अनेक पुरस्कार

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "गायक रवींद्र साठे – Marathisrushti Articles". www.marathisrushti.com. 2019-02-08 रोजी पाहिले.
  2. ^ Paranjape, Sameer. "Sameer Paranjape: रवींद्र साठे यांची जैत रे जैत या चित्रपटाबद्दल मी घेतलेली मुलाखत - समीर परांजपे". Sameer Paranjape. 2019-02-08 रोजी पाहिले.
  3. ^ "रवींद्र साठे यांना पी. सावळाराम पुरस्कार". Maharashtra Times. 2019-02-08 रोजी पाहिले.[permanent dead link]