रवींद्र शोभणे
डॉ. रवींद्र केशवराव शोभणे (१५ मे, १९५९ - ) हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. श्री.ना. पेंडसे यांचे साहित्य हा शोभणे यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. शोभणे हे अपूर्वाई नावाच्या दिवाळी अंकाचे सहसंपादक आहेत.
रवींद्र शोभणे यांनी लिहिलेली पुस्तके
- अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - विश्वनाथ प्रसाद तिवारी)
- अदृष्टाच्या वाटा (कथासंग्रह)
- अश्वमेध (कादंबरी, पडघम कादंबरीचा पुढचा भाग)
- उत्तरायण (महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी)
- ऐशा चौफेर टापूत (आत्मकथन)
- ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह)
- कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षाग्रंथ)
- कोंडी (कादंबरी)
- गोत्र
- चंद्रोत्सव (कथासंग्रह)
- चिरेबंद
- जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा)
- तद्भव (कादंबरी)
- त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा)
- दाही दिशा (कथासंग्रह)
- पडघम (कादंबरी)
- पांढर (कादंबरी)
- पांढरे हत्ती
- प्रवाह (कादंबरी)
- मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (संपादित)
- मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा)
- महत्तम साधारण विभाजक (कादंबरी)
- महाभारत आणि मराठी कादंबरी
- महाभारताचा मूल्यवेध
- रक्तध्रुव (कादंबरी)
- वर्तमान (कथासंग्रह)
- शहामृग (कथासंग्रह)
- सत्त्वशोधाच्या दिशा (कादंबरी)
- संदर्भासह (साहित्य आणि समीक्षा)
- सव्वीस दिवस (कादंबरी)
रवींद्र शोभणे यांना मिळालेले पुरस्कार
- 'उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार
- 'उत्तरायण'साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार
- 'उत्तरायण'साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.