Jump to content

रवींद्र पिंगे

रवींद्र पिंगे
जन्ममार्च १३, इ.स. १९२६ []
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूऑक्टोबर १७, इ.स. २००८
विलेपार्ले, मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार व्यक्तिचित्रण, ललीतलेखन, प्रवासवर्णन, साहित्य परिचय
प्रसिद्ध साहित्यकृती सर्वोत्तम रवींद्र पिंगे, शतपावली,पश्चिमेचे पुत्र, आनंदाच्या दाही दिशा, देवाघरचा पाऊस
वडील रामचंद्र परशुराम पिंगे
आई सुभद्राबाई रामचंद्र पिंगे
अपत्ये सांबप्रसाद पिंगे, चित्रा वाघ
पुरस्कार दमाणी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे 3 पुरस्कार, राष्ट्रीय कथा पुरस्कार, कोकण साहित्यभूषण व इतर अनेक पुरस्कार

रवींद्र पिंगे (मार्च २३, इ.स. १९२६[] - ऑक्टोबर १७, इ.स. २००८) हे मराठी लेखक होते.

जीवन

रवींद्र पिंग्यांचा जन्म मार्च २३, इ.स. १९२६ रोजी मुंबईत झाला. [कोकणातील] राजापूर तालुक्यातील उपळे हे पिंगे घराण्याचे मूळ गाव. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले.अर्थशास्त्र विषय घेऊन बी ए झाल्यावर त्यांनी मंत्रालयात पंधरा वर्षे नोकरी केली. ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात मराठी विभागात निर्माता पदावर होते. त्यांची सुमारे 40 पुस्तके प्रसिद्ध आहेत. घाटदार, अल्पाक्षरी, संदर्भसंपन्न लेखन हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य होते. ‘माणूस’ साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले सुमारे अडीचशे ललितलेख वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललित लेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती आहे.‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’व 'निवडक रवींद्र पिंगे' हे त्यांच्या निवडक लेखांचे संग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

प्रकाशित साहित्य

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. ८१.
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
परशुरामाची सावलीकादंबरी१९६७
प्राजक्ताची फांदीकथा
सुखाचं फूलकथाउत्कर्ष प्रकाशन१९८१
बकुळफुले -फुले मोहाचीललित लेखसंग्रहउत्कर्ष प्रकाशन१९८४
मुंबईचं फुलपाखरूललित लेखसंग्रहविश्वसखा प्रकाशन१९८१
आनंदाच्या दाही दिशाप्रवासवर्णन
पश्चिमेचे पुत्र ।। पाश्चात्य साहित्य परिचय
आनंदव्रतप्रवासवर्णन
दुसरी पौर्णिमाप्रवासवर्णन
शतपावलीव्यक्तिचित्रणराजहंस प्रकाशन१९७४
देवाघरचा पाऊसव्यक्तिचित्रणउत्कर्ष प्रकाशन१९७५
मोकळं आकाशललित लेखसंग्रह१९७८
दिवे-लामणदिवेव्यक्तिचित्रण
अत्तर आणि गुलाबपाणीव्यक्तिचित्रणमॅजेस्टिक प्रकाशन१९९७
पिंपळपानपाश्चात्य साहित्य परिचय
आनंद पर्वललित लेखसंग्रहउत्कर्ष प्रकाशन१९९४
प्रकाशाची खिडकीपाश्चात्य साहित्य परिचय
तुषार आणि तारेव्यक्तिचित्रण
सोनेरी सूर्यफुलंव्यक्तिचित्रणनवचैतन्य प्रकाशन२००५
शकुनाचं पानललित लेखसंग्रहचंद्रकला प्रकाशन२००५
समाधानाचं सरोवरललित लेखसंग्रहनिहारा प्रकाशन२००७
मानवंदनामानपत्रे
काही चंदेरी काही सोनेरीपाश्चात्य साहित्य परिचयज्ञानदा पब्लिकेशन१९९७
चिरेबंदीललित लेखसंग्रहअनुभव प्रकाशन२००१
सुखाचे पदरललित लेखसंग्रह
सर्वोत्तम रवींद्र पिंगेनिवडक लेखराजहंस प्रकाशन२००७
निवडक रवींद्र पिंगेनिवडक लेख