रवींद्र दिनकर बापट
रवींद्र दिनकर बापट | |
---|---|
जन्म नाव | रवींद्र दिनकर बापट |
टोपणनाव | रवी बापट |
जन्म | जून २, इ.स. १९४२ बालाघाट, मध्य प्रांत, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | प्राध्यापकी, शल्यविद्याशास्त्रज्ञ, लेखक, संशोधक, समाजशिक्षक |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | आत्मचरित्र, वैद्यकीय विषयांवरील लेख, संशोधनपत्रिका |
प्रसिद्ध साहित्यकृती | वॉर्ड नंबर पाच, केईएम; स्वास्थ्य; पोस्टमॉर्टम् |
वडील | डॉ. दिनकर बापट |
आई | डॉक्टर |
अपत्ये | उदय(थोरला), मिहीर(धाकटा मुलगा) |
डॉ. रवींद्र दिनकर बापट, अर्थात रवी बापट (२ जून, इ.स. १९४२ - हयात) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये चार दशके प्राध्यापक आहेत (इ.स. २०१२पर्यंत) आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या केईएम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.[ संदर्भ हवा ]
रवी बापटांचे वडील बालाघाटला सिव्हिल सर्जन होते. भाषावार प्रांतरचनेनंतर ते चांद्याला आले आणि सहा वर्षे राहिले. जेव्हा त्यांची मुंबईला बदली झाली तेव्हा वर्तमानपत्रात ’चांद्याचा देव चालला’[ संदर्भ हवा ] अशा मथळ्याचा अग्रलेख छापून आला होता. मुंबईत ते कामगार विमा योजनेचे प्रमुख होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० विमा डॉक्टरांना गैरवर्तणुकीसाठी काढून टाकले[ संदर्भ हवा ] आणि दोघांवर फौजदारी खटला भरला. पैकी एक वशिल्याने सुटला आणि दुसरा तुरुंगात गेला.[ संदर्भ हवा ]
शिक्षण
साहजिकच, रवी बापट यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणच्या सात शाळांत झाले. पाथ्रीकर गुरुजींनी त्यांचा पहिली-दुसरीचा अभ्यास मध्य प्रांतातील बालाघाट येथे घरीच करवून घेतला. नंतर तिसरीमध्ये ते पुण्यातील बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत होते. ५वीत भावे स्कूल, ६वीत अमरावतीला, ७वीत वाशीमला बक्षी सरांच्या शाळेत, आणि ८वीत हिंदी माध्यमात ते छिंदवाडा येथील शाळेत शिकले. आठवी सरतासरता ते जगदलपूरला आले. शेवटी दहावी-अकरावीसाठी ते परत बालाघाटला आले. म्हणजे ८वी ते ११वीचे त्यांचे शिक्षण मध्य प्रांतात हिंदी माध्यमातून झाले. बालाघाटला असताना त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली व ते जिल्ह्यामध्ये पहिले आले. अकरावीनंतर मात्र रवी बापट मुंबईत मावशीकडे रहायला आले.[ संदर्भ हवा ]
शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरित खेळांमध्ये रस होता. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधील पहिले वर्ष, रवी बापट यांनी एअरफोर्समध्ये प्रवेश मिळवण्यात खर्ची घातले. भाषांच्या परीक्षांत सूट मिळावी म्हणून ते एन.सी.सी.(नॅशनल कॅडेट कोअर)मध्ये दाखल झाले. रुईयातर्फे ते हॉकी खेळले. त्यांना इंटरला(कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला) परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाले आणि त्यांनी इ.स. १९५९मध्ये जी.एस.मेडिकल कॉलेजला विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.[ संदर्भ हवा ]
डॉक्टरीचा अभ्यास चालू असताना रवी बापट यांचे मैदानावर खेळणे चालूच राहिले. एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी ते कॉलेजतर्फे हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, टेबलटेनिस, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल हे खेळ तर खेळलेच, शिवाय त्यांचे त्यांदरम्यान ॲथलेटिक्सही चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांतून कामेही केली.[ संदर्भ हवा ]
त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रा. एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले आहे.[ संदर्भ हवा ]
साहित्य [ संदर्भ हवा ]
- अचूक निदान
- आर्डीबी’ज आर्ट ऑफ स्टडिइंग सर्जिकल पॅथॉलॉजी (इंग्रजी पुस्तक-१९९९)
- आर्डीबी’ज आर्ट ऑफ क्लिनिकल प्रेझेंटेशन इन सर्जरी (इंग्रजी पुस्तक-२००६)
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये १२३ शोधनिबंध लिहिले आणि १०२ संशोधनात्मक कार्ये (प्रोजेक्ट्स) सादर केली.
- स्वास्थ्यवेध (मराठी पुस्तक- )
- वॉर्ड नंबर पाच, केईएम (मराठी पुस्तक-)
- वॉर्ड नंबर पाच, केईएम (इंग्रजी पुस्तक-)
- पोस्टमॉर्टम (पुस्तक). लेखनसाहाय्य : सुनीति अशोक जैन
- सिंहासन चित्रपटात मुख्यमंत्र्याच्या डॉक्टर ची भूमिका
पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- ‘वॉर्ड नंबर पाच, केईएम’साठी साहित्य पुरस्कार २००७
- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार
- मुंबई ग्रंथालयाचा पुरस्कार
- वि.ह. कुलकर्णी स्मृति पारितोषिक
- कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप १९७५[१]
- अवरोधक काविळीचे रोगप्रतिकारवर्धन करणाऱ्या गुळवेलीच्या गुणांवरील संशोधनपर प्रबंधाला नापोली(इटली) येथे ॲगोस्टिनी ट्रॅपिनी हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक (१९९२)[२]
- ‘अचूक निदान’ या पुस्तकासाठी मसापचे २०१६ सालचे डॉ. पुष्पलता शिरोळ पारितोषिक