Jump to content

रवींद्र दामोदर लाखे

रवींद्र दामोदर लाखे मराठी एक कवी आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. हे कल्याणच्या मिति-चार कल्याण या नाट्यसंस्थेचे संस्थापक आहेत. त्यांचा जिव्हार हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी समतोल, पगला घोडा, वस्तू, प्रेमच म्हणू याला हवं तर (लेखक - सी.पी देशपांडे), अगदीच शून्य, सावित्री (लेखक - पु.शि. रेगे) या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

रवींद्र दामोदर लाखे यांचे साहित्य

  • अवस्थांतराच्या कविता (कवितासंग्रह)
  • जिव्हार (कवितासंग्रह)
  • संपर्कक्षेत्राच्या बाहेर (कवितासंग्रह)
  • जीवेलागणीच्या कविता (कवितासंग्रह )
  • आरभाट नोंदीचे प्रकरण ( गद्य )
  • नाटक एक मुक्तचिंतन ( वैचारिक )
  • रीलया ( कथासंग्रह )

रवींद्र लाखे यांच्या कवितांच्या परीक्षणासाठी येथे वाचावे.

रवींद्र लाखे हे २०१४ साली प्रकाशित झालेल्या 'डिजिटल' दिवाळी अंकाचे संपादक होते

पुरस्कार

  • राज्य शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक 2018
  • कवी भुजंग मेश्राम पारितोषिक
  • आपटे वाचन मंदिर इचलकरंजी यांचे कवी इंदिरा संत पारितोषिक
  • कवी श्रीधर शनवारे ( नागपूर ) पारितोषिक

मराठी प्रायोगिक रंगभूमीतल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धांमधून मिळालेली पारितोषिके

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता १९७५
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक १९८९, १९९७,२००४,२००५,
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य : २०१५ व इतर सन्मान
  • कै. नंदकुमार रावते पारितोषिक
  • विलासराव देशमुख फाऊंडेशन पारितोषिक
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठान पारितोषिक
  • सोविएट कल्चर पारितोषिक
  • कै. रामभाऊ पाटकर पारितोषिक
  • गोपीनाथ सावकार पारितोषिक
  • काशीनाथ घाणेकर पारितोषिक
  • अल्फा गौरव आणि महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००३
  • अनेक झी, मटा नाॅमिनेशन्स
  • ‘प्रेमच म्हणू ह्याला हवं तर’ ह्या लाखे यांच्या नाटकाचा राष्ट्रीय नाटक शाळा दिल्ली ह्यांच्या १२व्या भारत रंग महोत्सवात समावेश केला गेला होता.
  • अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे प्रायोगिक रंगभूमीवरील योगदानासाठी मिळालेला सन्मान
  • द ब्लॅक शीप ह्या लघु चित्रपटातून अभिनय. सदर फिल्म कांस चित्रपट महोत्सवात निवडली गेली होती. २०१५
  • ‘An interview with Mr Chacko” ह्या विलास सारंग ह्यांच्या कथेवर आधारित लघु चित्रपटातून प्रमुख भूमिका. २०१७
  • ‘रंगकमळ’ ह्या ध्वनिफितीचे दिग्दर्शन केले आहे. सदर ध्वनिफीत सुप्रसिद्ध लेखिका कमल देसाई ह्यांच्या कथांची आहे.
  • शिवाय, साहित्य अकादमी मधून भाषणे व परिसंवादात भाग घेतलेला आहे.
  • अगदीच शून्य हे नाटक काळा घोडा फेस्टिवल मध्ये सन्मानित.तसेच खानदेश नाट्यमहोत्सवात सन्मानित. एन सी पी ए ता झेस्ट फेस्टिवल मध्ये सादर केले गेले आहे.
  • सावित्री ह्या पु.शि.रेगे लिखित अभिजात कादंबरीचा रंगमंचीय आविष्कार रवींद्र लाखे ह्यांनी सादर केला. सदर नाटकाचे एकूण २६ प्रयोग झाले आहेत.