रविकिरण मंडळ
१९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला 'सन टी क्लब' असे नामाभिधानही देण्यात आलेले होते.[१]
मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाउन पोहोचली.[२] मंडळा कडून कविता वाचन, चर्चासत्र इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.
हे मंडळ १९३५ पर्यंत कार्यरत होते.[३]
मराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा दृढमूल करण्यात आणि ती समाजाभिमुख करण्यात रविकिरण मंडळाचे श्रेय फार मोठे आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली. कवी यशवंतांनी तर बुलंद स्वरात कविता गाऊन ती लोकप्रिय केली.[४]
लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या.
इतिहास
१९२१ च्या बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलना नंतर पेंढरकर, पटवर्धन व रानडे ह्या पुण्याच्या कवींनी दर रविवारी नियमित भेटून आपापल्या कविता व तत्कालीन साहित्याबद्दल चर्चा करण्याचे ठरविले. तद्नंतर मंडळ कविता-वाचनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. मंडळाने केलेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमांना त्या काळी खूप प्रसिद्धी मिळाली होती.
सदस्य कवी
- माधव त्र्यंबक पटवर्धन (माधव जुलियन)
- श्रीधर बाळकृष्ण रानडे व मनोरमा श्रीधर रानडे (या कविंबद्दल अधिक माहिती हवी आहे)
- यशवंत दिनकर पेंढरकर ( कवी यशवंत )
- गजानन त्र्यंबक माडखोलकर
- शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)
- द.ल. गोखले (या कवींबद्दल अधिक माहिती हवी आहे)
- शंकर काशिनाथ गर्गे (दिवाकर) मंडळा सोबतचा काळ ...ते....
- वि. द. घाटे
विरोध
त्या काळात काही सुधारणावादी कवीं आणि रविकिरण मंडळातील कवींनी मराठी कवितेला पंतकाव्याच्या बांधणीतून मुक्त करून. गजल्, सुनीत यासारखे परके काव्यप्रकार मराठीत रूढ व्हावेत म्हणून ते प्रयत्न केले.पण ते त्यांच्या सर्व ज्येष्ठांना आणि समकालीन काव्य रसिकांना भावलेच असे नाही. रविकिरण मंडळातील कवींच्या काव्यप्रवृत्तींना अनंततनय, बा. अ. भिडे इत्यादींचा विरोध असे.[५]
जुन्यावर प्रेम करणाऱ्या आणि परंपरेचा अभिमान असणाऱ्या प्र.के.अत्र्यांना या नवकाव्य प्रकारात मोडणाऱ्या कवितांबद्दल आक्षेप असे. म्हणून ते त्या कवितांचे विडंबन करीत असत. खूप लोकप्रिय आणि त्या काळी गाजलेल्या कवितांची अत्र्यांनी केलेली विडंबनेही (राजहंस माझा निजला/चिंचेवर चंदू चढला, पाखरा येशिल का परतून/परिटा येशील कधी परतून) तेवढीच लोकप्रिय झाली.[६]
निवडक कविता संकलन
रविकिरण मंडळाची निवडक कविता अनुराधा पोतदार आणि वसंत कानेटकर द्वारा संकलीत/संपादित (साहित्य अकादमी प्रकाशन)
इतर
- कवी दिवाकर ह्यांनी काही काळानंतर मंडळापासून फारकत घेतली.
- वि.द. घाटे हे सर्वांत तरुण व शेवटचे सभासद होते.
- लोकमान्य टिळक रहात असलेल्या गायकवाड वाड्यात बऱ्याच वेळा कविता वाचनाचा कार्यक्रम होत असे. व त्याचे आयोजक श्रीधर बळवंत टिळक असत.
प्रभाव
नंतरच्या काळात रविकिरण मंडळाचे चार सदस्य, माधव ज्युलियन, यशवंत, ग.त्र्यं. माडखोलकर आणिवि.द. घाटे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले.[७]
कविवर्य माधव ज्युलियन आणि रविकिरण मंडळ यांच्या कवितांचा फार मोठा प्रभाव शांताबाईंवर त्यांच्या संवेदनक्षम वयात पडलेला होता. ‘या मंडळीभोवती एक सोनेरी गुलाबी धूसर वलय असल्यासारखं वाटे’, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. काव्य लोकाभिमुख करण्याची मंडळाची धडपड त्यांना पटली होती. शांताबाईंनी मंडळाची काव्यगायनाची पद्धत स्वीकारली नाही, पण मूळची काव्यपठण पंरपरा आणि त्या माध्यमातून कवितेचा लोकांशी जुळणारा संवाद त्यांना महत्त्वाचा वाटत राहिला. रविकिरण मंडळाची एक ठळक खूण म्हणजे मंडळाने लेखनात अनुस्वाराऐवजी केलेला परसवर्णाचा वापर! शांताबाई आपले नाव कधीही ‘शांता’ असे लिहीत नसत. त्या आपले नाव ‘शान्ता’ असेच लिहीत. रविकिरण मंडळाच्या प्रभावाची ही खूण त्यांच्या नावात जणू एकरूप झाली होती.[८]
संदर्भ
- ^ http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/sahityasammelan09/0903/26/1090326043_1.htm. It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 02:58:31 GMT
- ^ महाराष्ट्र नायक.कॉम as it appeared on 31 Aug 2009 15:20:47 GMT[permanent dead link]
- ^ http://books.google.com/books?id=vfSPI2irzUgC&lpg=PA220&ots=gJCpwRsd58&dq=ravikiran%20mandal&pg=PA220#v=onepage&q=ravikiran%20mandal&f=false
- ^ Google's cache of http://www.dainikgomantak.com/Gomantak/05072009/NT0008C2DE.htm. [मृत दुवा]It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 07:35:30 GMT.
- ^ http://www.dainikgomantak.com/Gomantak/05072009/NT0008C2DE.htm. [मृत दुवा]अवलोकन- भावकवी यशवंत डॉ.सोमनाथ कोमरपंतIt is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 07:35:30 GMT.
- ^ http://www.mimarathi.net/node/1883. [मृत दुवा]It is a snapshot of the page as it appeared on 12 Feb 2011 04:24:13 GMT.
- ^ http://marathivishwakosh.in/khandas/khand14/index.php?option=com_content&view=article&id=10234
- ^ संदर्भ:डॉ. नीलिमा गुंडी दैनिक लोकसत्ता लेख as it appeared on 20 Aug 2009 23:07:23 GMT.[permanent dead link]