रमेशचंद्र वैशंपायन
रमेशचंद्र वैशंपायन हे एक मराठी नाट्यअभिनेते होते. मराठी रंगभूमी, ’भरत नाट्य संशोधन मंडळ’, वरद रंगभूमी आदी नाट्यसंस्थांच्या विविध संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातून ते निवृत्त झाले होते. ऑक्टोबर इ.स. २०१३मध्ये त्यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले.
वैशंपायन यांची भूमिका असलेली नाटके
- एकच प्याला
- तुझे आहे तुजपाशी
- भावबंधन
- मत्स्यगंधा
- मानापमान
- ययाती आणि देवयानी
- लग्नाची बेडी
- संशयकल्लोळ
- सौभद्र
पुरस्कार
- रमेशचंद्र वैशंपायन यांना, त्यांनी नाट्यसृष्टीला दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता (२०१०).