रमा माधव
रमा माधव हा माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल देव यांनी केले आहे.या चित्रपटाच्या लेखिका मनस्विनी लता रवींद्र या आहेत. आदिती राव हैदरी या अभिनेत्रीवर चित्रित केलेले एक विशेष गाणेही या चित्रपटात आहे.
कलाकार आणि त्यांच्या भूमिका
- रविंद्र मंकणी - बाळाजी बाजीराव पेशवे
- मृणाल कुलकर्णी - गोपिकाबाई
- अलोक राजवाडे - माधवराव पेशवे
- प्रसाद ओक - रघुनाथराव पेशवे
- अमोल रामसिंग कोल्हे - सदाशिवरावभाऊ
- योगेश सोमण - रामशास्त्री प्रभूणे
- पर्ण पेठे - रमाबाई पेशवे