रमाकांत आचरेकर
रमाकांत आचरेकर | |
---|---|
जन्म | १९३२ मालवण |
मृत्यू | २ जानेवारी २०१९ मुंबई |
पेशा | क्रिकेट प्रशिक्षक |
रमाकांत आचरेकर (१९३२ - २ जानेवारी २०१९) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी अनेक क्रिकेटरांना घडवले.
प्रशिक्षकी कारकीर्द
आचरेकरांच्य मार्गदर्शनाखाली तयार झालेले व सध्या खेळत असलेल्या काही खेळाडूंची नावे
- सचिन तेंडुलकर
- बलविंदर संधू
- चंद्रकांत पंडित
- विनोद कांबळी
- प्रवीण आमरे
- अजित आगरकर
- संजय बांगर
- रमेश पोवार
पुरस्कार
- इ.स. १९९० मध्ये, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला गेला[३]
- फेब्रुवारी ७ २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.[४]
- ७ एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[५]
- १३ फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी 'अचीव्हमेंट ऑफ अ लाइफटाइम' देऊन सन्मानित केले. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडने क्रीडा क्षेत्रातील विविध वर्गातील दिलेल्या पुरस्कारातील हा एक पुरस्कार आहे.[६]
आजारपण आणि मृत्यू
रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळातील आजारांमुळे २ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले. क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडू त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित होते.।[७]
संदर्भ
- ^ "'We have the talent, our problem is attitude!'". 15 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Play ruins play at Shivaji Park". 11 एप्रिल 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 मार्च 2013 रोजी पाहिले.
- ^ "Sports Awardees for "Dronacharya Award"". 20 नोव्हेंबर 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 मार्च 2013 रोजी पाहिले.
- ^ "श्री शिवछत्रपति राज्य क्रीडा पुरस्कार".
- ^ "Ramakant Vithal Achrekar gets Padma Shri Awards 2010". The Times of India. 13 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Ramakant Achrekar: Coach of Sachin Tendulkar : The True Dronacharya". १० सप्टेंबर २०१२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 March 2013 रोजी पाहिले.
- ^ Mumbai, India Today Web Desk. "Sachin Tendulkar's coach Ramakant Achrekar dies aged 86 in Mumbai". India Today (इंग्रजी भाषेत). 11 मार्च 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-01-07 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- पुरंदरे, कुणाल (2016). Ramakant Achrekar: Master Blaster's Master (इंग्रजी भाषेत). Lotus Collection/Roli Books. ISBN 9789351941163. ३ जानेवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २२ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- Panicker, Prem (20 July 1998). "Rediff On The NeT: The cricket interview/Ramakant Achrekar". Rediff.com.