रत्नेश्वर महादेव मंदिर
रत्नेश्वर महादेव मंदिर | ||
नाव: | रत्नेश्वर महादेव मंदिर | |
---|---|---|
स्थान: | ||
रत्नेश्वर महादेव मंदिर, मातृ-ऋण महादेव, किंवा वाराणसीचे झुकलेले मंदिर हे उत्तर प्रदेश, भारतातील वाराणसी शहरातील सर्वात छायाचित्रित मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर, वरवर पाहता चांगले जतन केलेले दिसते. हे मंदिर त्याच्या मागील बाजूस (उत्तर-पश्चिम) लक्षणीयपणे झुकलेले आहे. आणि त्याचे गर्भगृह उन्हाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर पाण्याच्या खाली असते. रत्नेश्वर महादेव मंदिर मणिकर्णिका घाट, वाराणसी येथे आहे. हे मंदिर अंदाजे नऊ अंश झुकलेले आहे.[१][२]
स्थापत्यशास्त्र
हे मंदिर अभिजात शैलीत बांधलेले असून यात नागर शिखर आणि फमसाना शैलीचे मंडप या मंदिरात दिसून येतात.[३] गंगेच्या काठावर असलेल्या वाराणसीतील इतर सर्व मंदिरांप्रमाणे हे मंदिर नदी पात्रात खोलवर पातळीवर बांधले गेले असून पाण्याची पातळी मंदिराच्या शिखरापर्यंत पोहोचू शकते.[४]
अगदी छोट्या पायाच्या या मंदिराचे गर्भगृह वर्षभर पाण्याखाली असते. २०व्या शतकातील छायाचित्रांमध्ये दिसून येणारा कल पाहता हे मंदिर चांगले जतन केले आहे.
इतिहास
या मंदिराला 'काशी करवट' असेही म्हणतात (काशी हे वाराणसीचे प्राचीन नाव आहे आणि करवट म्हणजे हिंदीमध्ये झुकणे. बांधकामाची प्रत्यक्ष वेळ अज्ञात आहे. तथापि, सुमारे ५०० वर्षांपूर्वी राजा मानसिंग यांच्या एका अज्ञात सेवकाने त्यांची आई रत्नाबाई यांच्यासाठी हे बांधले होते, असा दावा पुजारी करतात.[५] महसुली नोंदींनुसार ते 1825 ते 1830 दरम्यान बांधले गेले होते. मात्र , जिल्हा सांस्कृतिक समितीचे डॉ. रत्नेश वर्मा यांच्या मते , ते अमेठीच्या राजघराण्याने बांधले होते.[६] 1820 ते 1830 या काळात बनारस मिंटमध्ये परीक्षण तज्ञ असलेले जेम्स प्रिन्सेप यांनी रेखाचित्रांची एक मालिका तयार केली , ज्यापैकी एकामध्ये रत्नेश्वर महादेव मंदिर समाविष्ट आहे.[७] ते म्हणाले की जेव्हा मंदिराचे प्रवेशद्वार पाण्याखाली होते तेव्हा पुजारी पूजा करण्यासाठी पाण्यात डुबकी मारत असे.
काही स्त्रोतांचा दावा आहे की ग्वाल्हेरच्या राणी बैजाबाईने १९ व्या शतकात बांधले होते.[८] दुसऱ्या कथेनुसार, ते इंदूरच्या अहिल्याबाईच्या रत्नाबाई नावाच्या एका स्त्री सेविकेने बांधले होते. अहिल्याबाईंनी याला झुकण्याचा शाप दिला कारण तिच्या सेवकाने ते स्वतःच्या नावावर ठेवले होते.[२]
१८६० च्या छायाचित्रांमध्ये इमारत झुकलेली दिसत नाही. सध्याची छायाचित्रे सुमारे नऊ अंशांचा कल दर्शवतात. पाणी साचलेल्या पायामुळे इमारत झुकण्याची शक्यता आहे.[२] २०१५ मध्ये विजेच्या धक्क्याने शिखराच्या काही घटकांचे किंचित नुकसान झाले होते.[२]
स्थान
मणिकर्णिका घाटामध्ये हे मंदिर स्थित आहे. अहिल्याबाई होळकर यांनी १७९५ मध्ये बांधलेल्या तारकेश्वर महादेव मंदिराच्या[९] समोर आहे.[१०] जेथे भगवान शिव तारक मंत्र (मोक्ष मंत्र) पाठ करतात असे म्हणले जाते. दोन मंदिरांच्या मधोमध एक जागा आहे ज्याला १८३२ मध्ये जेम्सने बनारसमधील सर्वात पवित्र स्थान म्हणून संबोधले होते.[११] १८५ च्या छायाचित्रात एका मंदिराला विष्णुपद मंदिर असे म्हणले आहे. त्याच्या जवळच भगवान विष्णूच्या चरण पादुका असलेले गणेश मंदिर असावे. याठिकाणी केवळ प्रतिष्ठित व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.[१२] हेच ठिकाण १९०३ च्या छाप्यात सतीचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते.[१३]
गॅलरी
- १८३२ मधील जेम्सने टिपलेले चित्र. यात नदीतून बनारसमधील मणिकर्णिका घाट दिसून येतोय. डावीकडे तारकेश्वर मंदिर आहे..
- शहरातील सर्वात पवित्र ठिकाणी हार घालताना एक ब्राह्मण पुजारी. डावीकडे तारकेश्वर मंदिर आणि मध्यभागी बाबा मशननाथ मंदिर. स.न. १८३२ मध्ये जेम्स द्वारे काढलेले छायाचित्र..
- बनारसच्या अग्नीकुंडाच्या घाटाजवळ विष्णू पुड आणि इतर मंदिरे. प्रिन्स ऑफ वेल्स, १८६५ मध्ये किंग एडवर्ड सातवा याने अधिग्रहित केले. घाटांचे बांधकाम चालू असल्याए दिसून येत आहे.
- "सती स्तंभ", १९०३ स्टिरिओग्राफ.
- स.न. १९५३
- बुडलेले मंदिर, स.न. २०११. कल दिसत नसलेल्या कोनातून घेतलेले चित्र.
हे सुद्धा पहा
चित्र:India | हिंदू_धर्म दालन |
- काशी विश्वनाथ मंदिर
- श्री रत्नेश्वर महादेव मंदिर, कराची
- वाराणसीतील हिंदू मंदिरे
- श्री काशी करवट मंदिर
संदर्भ
- ^ पीसा की मीनार की तरह झुका हुआ है ये मंदिर, आज तक नहीं खुल पाया रहस्य dainikbhaskar.com, 14 September 2015
- ^ a b c d "Ratneshwar Mahadev - The Leaning Temple of Kashi". Varanasi Guru (इंग्रजी भाषेत). 2020-10-06. 2022-05-21 रोजी पाहिले.
- ^ iasmania (2016-01-12). "Temples Styles in North India (Nagara Style) Iasmania - Civil Services Preparation Online ! UPSC & IAS Study Material". Iasmania - Civil Services Preparation Online ! UPSC & IAS Study Material (इंग्रजी भाषेत). 2020-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-21 रोजी पाहिले.
- ^ Kashi Vishwanath JyotirLinga Temple Darshan in Varanasi - Part 1, at 8:28
- ^ "Leaning Temple of Varanasi beats the Leaning Tower of Pisa, this is how | Times of India Travel". timesofindia.indiatimes.com. 2020-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ किसके श्राप से टेढ़ा हुआ था यह मंदिर, भरा रहता है कीचड़, पढ़ें 5 MYTHS, dainikbhaskar.com | 14 March 2016
- ^ "James Prinsep | English antiquarian | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2022-05-21 रोजी पाहिले.
- ^ "Ratneshwar Mahadev - the Leaning Temple of Kashi". 6 October 2020.
- ^ "Manikarnika Ghat - The Burning Ghat of Varanasi". Varanasi Guru (इंग्रजी भाषेत). 2020-09-05. 2022-05-21 रोजी पाहिले.
- ^ "The Varanasi Heritage Dossier/Manikarnika Ghat - Wikiversity". en.wikiversity.org (इंग्रजी भाषेत). 2022-05-21 रोजी पाहिले.
- ^ Empty citation (सहाय्य)
- ^ Parry, Jonathan P. (1994-07-07). Death in Banaras (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-0-521-46625-7.
- ^ Empty citation (सहाय्य)