रतलाम जंक्शन रेल्वे स्थानक
रतलाम भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | रतलाम, रतलाम जिल्हा, मध्य प्रदेश |
गुणक | 23°20′24″N 75°3′0″E / 23.34000°N 75.05000°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ४९५ मी |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | RTM |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | रतलाम विभाग, पश्चिम रेल्वे |
स्थान | |
रतलाम |
रतलाम जंक्शन हे मध्य प्रदेशच्या रतलाम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले रतलाम स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. महाराष्ट्र व गुजरातकडून पश्चिम रेल्वेमार्गे दिल्ली व उत्तरेकडे धावणाऱ्या सर्व गाड्या रतलाममार्गे जातात. तसेच येथून एक फाटा इंदूरकडे तर दुसरा फाटा राजस्थानमधील चित्तोडगढकडे जातो.
प्रमुख गाड्या
- मुंबई राजधानी एक्सप्रेस
- ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस
- मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस
- गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस
- पश्चिम एक्सप्रेस
- अवध एक्सप्रेस
- साबरमती एक्सप्रेस
- पुणे−इंदूर एक्सप्रेस
- अवंतिका एक्सप्रेस