Jump to content

रतन बाई

रतन बाई

रत्तन बाई (जन्म : १५ जुलै १८९०) या भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील एक मराठी अभिनेत्री होत्या. सरकारी अधिकाऱ्याच्या घरात वाढलेल्या रत्तन बाई अतिशय सुंदर होत्या. त्यांचे केस पायाच्या घोट्याला टेकतील इतके लांब होते. आजही त्यांच्या अभिनयाचा वारसा चालवणारे अनेक जण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. ४०-५० च्या दशकांमध्ये प्रसिद्धिस आलेल्या शोभना समर्थ यांच्या त्या मातोश्री, आणि अनुषंगाने त्या नूतन आणि तनुजा यांच्या आजी होत्या. अभिनेत्री नलिनी जयवंत ही त्यांची भाची होती.

रत्तन बाई यांनी त्यांच्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असलेल्या डॉ. प्रभाकर शिलोत्री यांच्याशी लग्न केले. त्यांची कन्या सरोज शिलोत्री पुढे शोभना समर्थ म्हणून ओळखली जाऊ लागली.

रत्तन बाई याची भूमिका असलेले चित्रपट

  • करवाने हयात
  • द डॉटर्स ऑफ ए ज्यू
  • भारत की बेटी
  • भिखारन
  • मालन
  • मोहोब्बत की कसौटी
  • यास्मिन
  • रूपलेखा
  • श्रीकृष्ण अर्जुन युद्ध
  • सरला
  • सितारा
  • स्वराज्याच्या सीमेवर (मराठी)
  • हिंदी महिला