Jump to content

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान
आययुसीएन वर्ग २ (राष्ट्रीय उद्यान)
रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला
रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला
रणथंभोर राष्ट्रीय उद्यानचे ठिकाण दाखविणारा नकाशा
रणथंभोर राष्ट्रीय उद्यानचे ठिकाण दाखविणारा नकाशा
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान
ठिकाणसवाई माधोपूर, राजस्थान, भारत
जवळचे शहरसवाई माधोपूर (११ किमी)
गुणक26°01′02″N 76°30′09″E / 26.01722°N 76.50250°E / 26.01722; 76.50250गुणक: 26°01′02″N 76°30′09″E / 26.01722°N 76.50250°E / 26.01722; 76.50250
क्षेत्रफळ ३९२ चौरस किलोमीटर
स्थापना १९८०
नियामक मंडळभारत सरकार, वन आणि पर्यावरण मंत्रालय
संकेतस्थळwww.tourism.rajasthan.gov.in/ranthambore.html


रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.

या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मीक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवा व नीलगाय यांचाही समावेश होतो.

रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती

  • राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ - एकूण ३९२ चौरस किमी. त्यातील गाभाक्षेत्र २७५ चौ. किमी.
  • व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र - १३३४ चौ.किमी.
  • समुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मीटर
  • जंगलाचा प्रकार - विषववृत्तीय शुष्क प्रकारचे जंगल
  • उद्यानाला भेट देण्याचा कालावधी - नोव्हेबर ते मार्च दरम्यान कधीही

इतर

  • रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात.तसेच अन्य प्राणी, पक्षीही दिसतात. येथे मोरांची संख्या खूप आहे. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
  • ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वतःची शिकारीची शैली बनवली होते. त्याप्रमाणे तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे तो पाण्यात तुफानी वेगाने हालचाली करायचा व शिकार साधायचा[]. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरीक्षण केले आहे व या वाघाने केलेल्या शिकारींची क्षणचित्रे वाघावरच्या अनेक माहितीपटांत आहेत.

बाह्य दुवे

छायाचित्रे

संदर्भ

  1. ^ Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent