रणजी करंडकातील विक्रम
या लेखात रणजी करंडक या भारतातील प्रथम वर्गीय क्रिकेट स्पर्धेतील विक्रम दिलेले आहेत.
फलंदाजीतील विक्रम
- कारकिर्दीत सर्वाधिक धावा : अमोल मुजुमदार -८,६४३ धावा
- एका डावात सर्वाधिक धावा : भाऊसाहेब निंबाळकर - नाबाद ४४३
- कारकिर्दीत सर्वाधिक शतके : अजय शर्मा - ३१ शतके
- कारकिर्दीत सर्वाधिक सरासरी (निकष : किमान ३५०० धावा) : विजय मर्चंट - ९८.७५
- एका हंगामात सर्वाधिक धावा : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण - १,४१५ धावा (हैदराबाद संघाकडून १९९९-२००० च्या हंगामात)
गोलंदाजीतील विक्रम
- कारकिर्दीत सर्वाधिक बळी : राजिंदर गोयल - ६३७ बळी
- डावात सर्वोत्तम गोलंदाजी : प्रेमांग्शू चटर्जी - २० धावा देऊन १० बळी (आसामविरुद्ध बंगालसाठी १९५६-५७ च्या हंगामात)
- एका हंगामात सर्वाधिक बळी : बिशनसिंग बेदी - ६४ बळी (१९७४-७५ च्या हंगामात दिल्लीसाठी)
सांघिक विक्रम
- एका डावात सर्वोच्च धावसंख्या : हैदराबाद -६ बाद ९४४ घोषित (आंध्राविरुद्ध १९९३-९४)