रघुपती राघव राजा राम
रघुपती राघव राजा राम हे एक भजन आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात आणि देशकार्यात या भजनाचा विशेष प्रसार केल्याने [१]ते भारतात लोकप्रिय ठरले आहे.[२] या भजनालाच रामधून असेही म्हणले जाते.[३]
इतिहास
मूळ रचना लक्ष्मणाचार्य यांची असून ती पुढीलप्रमाणे-[४]
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥
सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥
भद्रगिरीश्वर सीताराम भगत-जनप्रिय सीताराम ॥
जानकीरमणा सीताराम जयजय राघव सीताराम ॥
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥
- श्रीलक्ष्मणाचार्य
सतराव्या शतकातील मराठी संतकवी समर्थ रामदास यांच्या रचनेवर आधारित या भजनाला पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी संगीतबद्ध केले आहे.[५]
हिंदी रचना
रघुपति राघव राजाराम,
पतित पावन सीताराम
सीताराम सीताराम,
भज प्यारे तू सीताराम
ईश्वर अल्लाह तेरो नाम,
सब को सन्मति दे भगवान
राम रहीम करीम समान
हम सब है उनकी संतान
सब मिला मांगे यह वरदान
हमारा रहे मानव का ज्ञान
महात्मा गांधी यांनी मूळ भजनावर आधारित ही हिंदी रचना तयार केली. [६]सत्य आणि अहिंसा या तत्त्वांना अनुसरून आपले जीवनकार्य आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यामध्ये योगदान देताना गांधीजींना या भजनातील तत्त्वज्ञान सर्वसमावेशक वाटले आणि त्यांनी त्याचा अंगिकार केला.
संदर्भ
- ^ Helfenstein, Josef; Newland, Joseph N. (2014). Experiments with Truth: Gandhi and Images of Nonviolence (इंग्रजी भाषेत). Menil Collection. ISBN 978-0-300-20880-1.
- ^ Dalton, Dennis (2000). Mahatma Gandhi: Nonviolent Power in Action (इंग्रजी भाषेत). Columbia University Press. ISBN 978-0-231-12237-5.
- ^ Sapre, Swapnil (2016-12-08). Understanding Indian Music through Rhythms (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 978-1-365-58825-9.
- ^ सिंह, विकास (2020-08-09). "रघुपति राघव राजा राम भजन लिखित - raghupati raghav raja ram lyrics in hindi". दा इंडियन वायर (हिंदी भाषेत). 2020-10-03 रोजी पाहिले.
- ^ Pattanaik, Devdutt (2017-10-09). Ram: The Rightful Ruler (Penguin Petit) (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 978-93-87326-11-8.
- ^ Beck, Guy L. (2006-07-17). Sacred Sound: Experiencing Music in World Religions (इंग्रजी भाषेत). Wilfrid Laurier Univ. Press. ISBN 978-0-88920-421-8.