Jump to content

रघुनाथ रामचंद्र किणीकर

रघुनाथ रामचंद्र किणीकर
जन्म नाव रघुनाथ रामचंद्र किणीकर
टोपणनाव रॉय किणीकर
जन्मइ.स. १९०७
मृत्यू ५ सप्टेंबर, इ.स. १९७८
कार्यक्षेत्रसाहित्य, पत्रकारिता, अभिनय
भाषामराठी
साहित्य प्रकार कविता, नाटक, कथा, कादंबरी

रघुनाथ रामचंद्र किणीकर तथा रॉय किणीकर (इ.स. १९०७ - ५ सप्टेंबर, इ.स. १९७८) हे मराठी भाषेतील कवी, नाटककार, पत्रकार होते. त्यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला.

रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काहीना काही ललित लेखन करीत असत.

रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या आहेत. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत. रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत.


प्रकाशित साहित्य

किणीकरांनी नाटक, एकांकिका, कथा, कादंबरी, अनुवाद, बालसाहित्य अशा साहित्याच्या बहुतेक प्रत्येक क्षेत्रात लिखाण केले असले तरी रात्र आणि प्रामुख्याने उत्तररात्र ह्या दोन कवितासंग्रहांच्या माध्यमातून रॉय किणीकर हे जाणकारांना जास्त परिचीत आहेत. रॉय किणीकर हे त्यांच्या शैलीबद्ध "रुबायांसाठी" ओळखले जात.

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
अँड नाउ मिगेलसहलेखक Joseph Krumgold
आंधळे रंग, पांगळ्या रेषाकथासंग्रह
इथे जगण्याची सक्ती आहेअनुवादित
उत्तररात्रकवितासंग्रहचार ओळींच्या रुबाईवजा रचनांचे पुस्तक
एकदाच अशी रात्र येतेअनुवादित नाटक
किती रंगला खेळनाटक
कोनार्ककादंबरी
खजिन्याची विहीरनाटक
गांधी नावाचे महात्माचरित्र
दर्यावर्दी कोलंबसअनुवादित
देव्हाराएकांकिका
फुलराणीबालसाहित्य
मंगळसूत्रनाटक
ये गं ये गं विठाबाईनाटक
रम्य ते बालपणअनुवादित
रात्रकवितासंग्रह
शिल्पायननिबंधसंग्रहमनोविकास प्रकाशनइ.स. २०१३
साऊंड ट्रॅकएकांकिका

रॉय किणीकर यांना मिळालेले पुरस्कार

  • ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे १९६३ सालचे लेखन पारितोषिक.

रॉय किणीकर यांच्याविषयीची पुस्तके

  • रॉय किणीकर माणूस आणि साहित्य (लेखक अनिल किणीकर)

बाह्य दुवे