Jump to content

रघुनाथ पांडुरंग करंदीकर

रघुनाथ पांडुरंग करंदीकर (जन्म : पंढरपूर, ऑगस्ट २१ १८५७ - - सातारा, एप्रिल २४, १९३५) हे मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असे साहित्यिक होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते. इ.स. १८४०मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते वकिली करण्याकरिता साताऱ्यात स्थायिक झाले. करंदीकर हे लोकमान्य टिळकांचे निष्ठावंत सहकारी आणि स्नेही होते. जेथे जात, तेथून ऐतिहासिक साधने गोळा करून आणीत. इ.स. १९१८साली ते इंग्लंडला गेले, आणि तेथून त्यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचा भारताच्या रेसिडेन्टबरोबर झालेला पत्रव्यवहार नकलून भारतात आणला. मेणवली येथील नाना फडणवीस यांचे दप्तर त्यांच्या वंशजांकडून मिळवून करंदीकरांनी ते दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्याकरवी प्रसिद्ध करविले.

र.पां. करंदीकर यांची पुस्तके

  • केदारखंड-यात्रा (पत्ररूपातील प्रवासवर्णन-१९३६), प्रकाशक : दत्तात्रय रघुनाथ करंदीकर
  • विलायतेहून धाडलेली पत्रे (१९३५)

र.पां. करंदीकर यांची दैनंदिनी

’रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी’ (१९६२) या नावाचे एक पुस्तक वि.रा. करंदीकर यांनी संपादित केले आहे.

संकीर्ण

रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे १९०५ साली साताऱ्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.