Jump to content

रघुनाथ पंडित

रघुनाथ पंडित हे मराठी काव्य परंपरेतील हे एक श्रेष्ठ पंडित व कवी होत. त्यांचा जन्म बहुधा सतराव्या शतकातला असावा. परंतु त्याबद्दल वाद असून, त्यांचा काळ अनिर्णित आहे. त्यांचे संस्कृत व फार्सी या भाषांवर प्रभुत्व होते. ते महाभारतातील कथा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे कवी आहेत.

जीवन

रघुनाथ पंडित हे छ. शिवाजी महाराजांच्या काळातील असावेत असे अ.का.प्रियोळकर व द.सी.पंगू यांचे अनुमान आहे.

काव्य संपदा

  • रामदास वर्णन
  • गजेंद्रमोक्ष

दमयंती स्वयंवर

त्यांची "दमयंती स्वयंवर" ही सतराव्या शतकातील मराठी भाषेतील मुख्य गणल्या जाणाऱ्या रचनांपैकी एक आहे. []

त्यातील उदाहरणादाखल एक कडवे:

तेथील एक कलहंस तटीं निजेला ।
जो भागला जलविहार विशेष केला ॥
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो ।
पक्षी तनु लपवि, भूप तया पाहतो ॥१॥
~(दमयंती स्वयंवर श्लोक क्र. ४२) - संपादक अ. का. प्रियोळकर

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2023-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-20 रोजी पाहिले.