रखुमाई
रखुमाई ही विठ्ठलाची पत्नी आहे. तिला रुक्मिणी स्वरुप समजतात.
कथा
रुक्मिणी श्री विठ्ठलाची अर्धांगिनी आहे. ती रुसून पंढरपूरमध्ये आली म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधात पंढरपूरला आले आणि ते पंढरपूरचेच झाले. ज्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधत आले ते प्रथम गोपाळपूर येथे आले त्या जागेस विष्णूपद असे म्हणतात. आजही मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री विठ्ठल विष्णूपद येथे वास्तव्यास असतात अशी आख्यायिका आहे. रुक्मिणीचा शोध सुरू असताना विठ्ठलाला भक्त पुंडलिक भेटले आणि त्याची मातृ-पितृ-भक्ती पाहून प्रसन्न झाले. त्यांनी पुंडलिकाला भेटण्यासाठी बोलवले परंतु पुंडलिकाने त्याच्याजवळील एक वीट भिरकावली आणि 'त्यावर उभे रहा, मी माझ्या आई-वडिलांची सेवा करून झाल्यावर येतो' असे सांगितले, त्या क्षणापासून आजतागायत भगवंत त्या विटेवर उभे राहून भाविकांना दर्शन देत आहेत .