रक्षा खडसे
रक्षा खडसे | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१४ | |
मागील | हरीभाऊ जावळे |
---|---|
मतदारसंघ | रावेर (लोकसभा मतदारसंघ) |
जन्म | १३ मे, १९८७ खेडदिगर, नंदुरबार, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | निखिल खडसे |
नाते | * एकनाथ खडसे (सासरे)
|
अपत्ये | १ मुलगा, १ मुलगी |
निवास | * मुक्ताई (फार्म हाऊस) , ता. मुक्ताईनगर , जि. जळगाव.
|
रक्षा निखिल खडसे (१३ मे, १९८७ - हयात) ह्या एक भारतीय राजकारणी व १७ व्या लोकसभेच्या सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या खडसे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन ह्यांचा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.[१]
२०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आल्या[२].
हीना गावित ह्यांच्यासोबत रक्षा खडसे ह्या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरुण सदस्य आहेत (वय : २६).
जिवन
या मुक्ताईनगरच्या रहिवासी आहेत.त्या NCP.नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत[३].
राजकीय कारकीर्द
रक्षा खडसे २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.त्या कोथळी (ता. मुक्ताईनगर) गावच्या सरपंच होत्या नंतर त्या जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आल्या. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मनीष जैन यांचा सव्वातीन लाख मतांनी पराभव केला.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या.[४].२०१९ लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे रावेर लोकसभा मतरसंघातून पुन्हा निवडून आल्या[५].
विवाद
२८ जानेवारी २०२१ भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळ www.BJP.org वर रक्षा खडसे यांचा , भाजपा खासदारांच्या यादीत अपमानास्पद उल्लेख करण्यात आला. रक्षा खडसे यांनी याबद्दल आपल्याला दुःख झाले असल्याचे म्हणले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी करणार असल्याचे माध्यमाना सांगितले. [६][७][८]
संदर्भ
- ^ https://www.indianexpress.com/elections/fadnavis-bats-for-khadses-daughter-in-law-5685244/lite/
- ^ वृत्तपत्र, महाराष्ट्र टाईम्स (२०१९). "खडसेंचे वर्चस्व सिद्ध". जिल्हा जळगाव, महाराष्ट्र, भारत: Maharashtra Times newspaper. pp. १.
- ^ Digital team, TV 9 Marathi (२०१९). "एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत, सभेत एकट्या पडलेल्या रक्षा खडसे यांचे अश्रू अनावर". मुक्ताईनगर , मुंबई , महाराष्ट्र ,भारत: टीव्ही ९ मराठी. pp. १.
- ^ Digital team, TV 9 Marathi. "एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत, सभेत एकट्या पडलेल्या रक्षा खडसेंना अश्रू अनावर". मुक्ताईनगर , मुंबई , महाराष्ट्र, भारत .: TV 9 Marathi. pp. १.
- ^ Newspaper, Maharshtra Times (२०१९). "खडसेंचे वर्चस्व सिद्ध". मुक्ताईनगर , महाराष्ट्र ,भारत.: Maharashtra Times newspaper. pp. १.
- ^ https://www.timesnownews.com/amp/india/maharashtra-news/article/bjp-s-official-website-tags-raksha-khadse-as-homosexual-anil-deshmukh-slams-here-s-the-truth/712892
- ^ https://m.lokmat.com/photos/mumbai/thanks-home-minister-anil-deshmukh-didnt-want-do-raksha-khadase-bjp-website-tweet-a601/?utm_source=Lokmat.com&utm_medium=infiniteGallery-Mobile
- ^ https://www.deccanherald.com/amp/national/west/maharashtra-bjp-mp-raksha-khadse-described-as-homosexual-anil-deshmukh-slams-saffron-party-944277.html