रक्तक्षय
रक्तातील पेशींची संख्या कमी झाली, की रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढ व्यक्तीच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण 13 ग्रॅम प्रति 100 मिलिलिटर्स असे रक्तात असायला हवे. ते प्रमाण 10 ग्रॅम किंवा कमी झाल्यास त्या व्यक्तीला दखलपात्र रक्तक्षय झाला आहे, असे म्हणतात. रक्तक्षय होण्याचे प्रमुख कारण रक्तस्त्राव होत राहणे हे आहे.
कारणे
बोन मॅरो अकार्यक्षम झाल्यास् रक्तक्षय होतो. काही कीटकनाशकांचा परिणाम, बेन्झिनच्या रेणुशी आलेला संपर्क, काही ऑटो इम्युन विकार, अशा अनेक करणांनी असा रक्तक्षय होतो.