Jump to content

रंभा

रंभा ही इंद्राच्या दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती.

रामायणातील संदर्भाप्रमाणे ती कुबेराचा पुत्र नलकुबेर याची पत्नी होती. रावणाने तिचे अपहरण करून तिच्यावर बळजबरी केली. यावर रूष्ट होऊन नलकुबेराने रावणाला शाप दिला की 'यापुढे जर त्याने एखाद्या स्त्रीशी तिच्या इच्छेविरूद्ध संबंध ठेवला तर त्याच्या डोक्याचे सात तुकडे होऊन त्याला मरण येईल.' यामुळेच रावणाच्या ताब्यातील सीता सुखरूप राहिल्याचे सांगितले जाते.