रंगवैखरी
रंगवेखरी या महाराष्ट्रात होणाऱ्या राज्यस्तरीय कलास्पर्धा आहेत.
मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती यासंदर्भातील विविध कार्यक्रम महाराष्ट्रात सातत्याने होत असतात. असे असले तरी महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा या विषयाला केंद्रीभूत मानून त्यायोगे मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची संस्कृती यांचे सादरीकरण एकाच ठिकाणी करता येईल अशी स्पर्धा नसल्याचे लक्षात घेऊन राज्य मराठी विकास संस्थेमार्फंत मराठी साहित्याबरोबरच नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य अशा इतर कलांमधून मराठी भाषा व महाराष्ट्रीय संस्कृती यांचे रंगमंचीय नाट्याविष्कार करणाऱ्या'रंगवैखऱी' आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सन २०१७-१८ पासून आयोजित करण्यात येत आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांच्या संघांतील सर्व कलावंत, लेखक, दिग्दर्शक हे संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असणे व स्पर्धेच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिकत असणे बंधनकारक आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रात राज्यस्तरीय असून पूर्व प्राथमिक फेरी, प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी, महाअंतिम फेरी अशा चार फेऱ्यांमध्ये होते. कलावंताचा हा कलाविष्कार ४० मिनिटांच्या अवधीत सादर करणे अपेक्षित असते.
रंगवैखरी-पर्व पहिले - सन २०१७-१८
विषय - महाराष्ट्री ते मराठी
रंगवैखरी पर्व दुसरे २०१८-१९
विषय - नव्या वाटा
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80&action=edit
रंगवैखरी पर्व तिसरे २०१९-२०
विषय - कथारंग