Jump to content

योहानेस केप्लर

योहानेस केप्लर

अनामिक चित्रकाराने रंगविलेले केप्लरचे चित्र (इ.स. १६१०)
जन्मडिसेंबर २७, १५७१
श्टुटगार्टजवळील वाइल देर श्टाट, जर्मनी
मृत्यूनोव्हेंबर १५, १६३०
रेगेन्सबुर्ग, बव्हेरिया, पवित्र रोमन साम्राज्य
निवासस्थानबाडन-व्युर्टेंबर्ग, स्टायरिया, बोहेमिया, ओबरओस्टराईश
धर्मल्युथेरन
कार्यक्षेत्रखगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, निसर्गविषयक तत्त्वज्ञान
कार्यसंस्थालिंत्स विद्यापीठ
प्रशिक्षणट्युबिंगन विद्यापीठ
ख्यातीकेप्लरचे नियम

योहानेस केप्लर (डिसेंबर २७, १५७१ - नोव्हेंबर १५, १६३०) हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रांतीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमांबद्दल नावजला जातो. केप्लरचा कल कोपर्निकसच्या बाजूने होता. केप्लर, टीको ब्राहेचा गणितज्ञ होता. टीकोच्या मृत्यूनंतर त्याच्या वेधशाळेत त्याच्या वह्या आणि नोंदणीपुस्तकांचा सखोल अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले. केप्लरने ग्रहांच्या गतीचे तीन नियम दिले.