Jump to content

योआखिम ल्योव

योआखिम ल्योव

योआखिम ल्योव (जर्मन: Joachim Löw; ३ फेब्रुवारी १९६० (1960-02-03), श्योनाउ, पश्चिम जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व जर्मनी राष्ट्रीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २००४-०६ दरम्यान जर्मन संघाचा उप-प्रशिक्षक असलेला ल्योव २००६ पासून प्रशिक्षकपदावर आहे. त्याने आजवर २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २००८, २०१० फिफा विश्वचषक, युएफा यूरो २०१२, २०१४ फिफा विश्वचषकयुएफा यूरो २०१६ ह्या प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मनीच्या प्रशिक्षकाचे काम पाहिले आहे.

जर्मनीच्या प्रशिक्षकपदापूर्वी ल्योव फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट, फेनर्बाचे एस.के., कार्ल्सरुहेर एस.से. इत्यादी क्लबांचा प्रशिक्षक राहिला आहे.

बाह्य दुवे