Jump to content

येसुगेई

चंगीझ खानाचे वडील व मंगोलियाच्या समशीतोष्ण गवताळ प्रदेशातील एका टोळीचे टोळीप्रमुख. किराईत टोळीच्या वांग खान या प्रमुखाचा येसुगेई चांगला मित्र व मांडलिक होता. या दोघांनी एकत्र अनेक हल्ले केले होते व पुढे मैत्री लक्षात घेऊन वांग खानाने मदत केल्याने त्याचा फायदा पुढे चंगीझला झाला.

चंगीझचे लग्न ठरवून परतताना तातार टोळीने विषप्रयोग केल्याने चंगीझखानच्या बालपणीच येसुगेईचा मृत्यू झाला.