Jump to content

येवती

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या कऱ्हाड तालुक्यातील एक गाव आहे़ कऱ्हाडच्या पश्चिमेकडे असलेल्या उंडाळेपासून बारा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात हे गाव वसलेले आहे. गावात पुरातन भैरवनाथ मंदिर आहे. जवळच एक अब्ज घनफूट पाणी साठविण्याची क्षमता असलेले धरण आहे. गावाच्या जवळच रयत साखर कारखाना आहे.