Jump to content

येरवडा मध्यवर्ती कारागृह

ইয়েরাওয়াড়া কেন্দ্রীয় কারাগার (bn); યરવડા કેન્દ્રીય કારાગૃહ (gu); येरवडा मध्यवर्ती कारागृह (mr); 耶尔瓦达中央监狱 (zh); Yerawada Centralfængsel (da); یردودا مرکزی جیل (ur); سجن يراوادا المركزى (arz); यरवदा केंद्रीय कारागार (hi); യർവാദാ സെൻട്രൽ ജയിൽ (ml); エルワダ中央刑務所 (ja); 耶爾瓦達中央監獄 (zh-hant); 耶尔瓦达中央监狱 (zh-cn); ఎరవాడ సెంట్రల్ జైలు (te); ਯਰਵਦਾ ਕੇਂਦਰੀ ਜੇਲ੍ਹ (pa); Yerawada Central Jail (en); سجن يراوادا المركزي (ar); 耶尔瓦达中央监狱 (zh-hans); ஏர்வாடா மத்திய சிறை (ta) पुण्याजवळील कारागृह, भारत (mr); భారతదేశంలోని పూణే సమీపంలో ఉన్న జైలు (te); jail in Pune, India (en); سجن فى الهند (arz); ভারতের পুনে নগরীর কাছে অবস্থিত কারাগার (bn) Yerwada Central Jail (en); エラワダ中央刑務所 (ja); Yerwada Central Jail (ml)
येरवडा मध्यवर्ती कारागृह 
पुण्याजवळील कारागृह, भारत
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारतुरुंग
स्थान येरवडा, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
Street address
  • Yerawada, Pune, Maharashtra 411006
चालक कंपनी
वारसा अभिधान
  • Gandhi Heritage Site
  • PMC Heritage Grade II
स्थापना
  • इ.स. १८७१
Map१८° ३३′ ५२.४७″ N, ७३° ५३′ २२.७४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
येरवडा मध्यवर्ती तुरुंग प्रवेशद्वार

येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला महासुरक्षित तुरुंग आहे. हा तुरुंग महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग आहे, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. यात अंदाजे ३,६०० कैदी बंदिस्त राहू शकतात.

या तुरुंगात महात्मा गांधींपासून अजमल कसाबपर्यंत अनेक व्यक्ती येथे बंदिवासात होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकही ह्या तुरुंगात बंदिवासात होते.

रचना

हे कारागृह ५१२ एकर जागेत पसरलेले आहे.[] इथे ५०००हून जास्त कैदी राहू शकतात आणि दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगात अत्याधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी अंडा सेलसुद्धा आहेत.

इतिहास

पुणे करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या दिवशी एम.आर.जयकर, तेज बहादूर सप्रू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर येरवडा कारागृहात

येरवडा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी १८७१ मध्ये बांधले. तेव्हा येरवडा पुणे गावाबाहेर होते.[]

ब्रिटिश राजवटीमध्ये या कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कारावासात ठेवले होते. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस,जोकिम अल्वा आणि लोकमान्य टिळक आणि भुरालाल रणछोडदास शेठ यांचा समावेश आहे.[] १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा येथे ठेवण्यात आले होते.[] महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. विशेषतः १९३२ आणि नंतर १९४२ मध्ये चले जाव चळवळीच्या वेळी ते इथे होते. १९३२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यावर त्यांना येथे ठेवण्यात आले होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केल्यामुळे गांधीजींनी आमरण उपोषणास सुरुवात केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर गांधीजींनी हे उपोषण मागे घेतले.[] मे १९३३ मध्ये गांधीजींची तुरुंगवासातून सुटका करण्यात आली.[]

१९७५-७७ मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या अनेक राजकीय विरोधकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, प्रमिला दंडवते आणि वसंत नारगोळकर यांचा सामावेश आहे.[][]

१९९८ मध्ये प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांनी दाखल केलेला अब्रूनुकसानीचा खटला हरल्यावर काही काळ या तुरुंगात होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त २००७ मध्ये या तुरुंगात होता. तसेच स्टँप पेपर घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगी या तुरुंगात होता.[] २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अटक केलेला दहशतवादी अजमल कसाब २००८ मध्ये या तुरुंगात होता. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये येथेच फाशी देण्यात आले आणि दफन करण्यात आले.[]

खुले कारागृह

येरवडा खुले कारागृह हे येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर याच आवारात आहे.जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ज्या कैद्यांनी शिक्षेची पाच वर्षे पूर्ण केली आहे आणि या काळात चांगले वर्तन दाखवले आहे, त्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवतात. येथे मूलभूत सुरक्षा असते आणि त्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही.[१०] खुल्या कारागृहातील कैदी पाच गुंठे जमिनीत शेती पिकवतात. याशिवाय येथील गोठ्यात ३० गायी आहेत. त्यांचे शेण येथील शेतीसाठी वापरले जाते. खुल्या कारागृहातील महिला कैदीसुद्धा शेती करतात. विविध फळभाज्या, पालेभाज्या, भात, हरभरा इ.ची लागवड केली जाते. भाज्या कारागृहातील स्वयंपाकघरासाठी वापरल्या जातात.[११]

विविध उपक्रम

तुरुंगातील रेडीओ स्टेशन

गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी येरवडा कारागृहात एक उपक्रम राबवला जातो. याची सुरुवात २००२ असीम सरोदे यांनी केली. या उपक्रमांतर्गत कैद्यांना वर्षभर गांधीजींची विचारसरणी शिकवली जाते. वर्षाच्या शेवटी ‘गांधी विचार परीक्षा’ घेतली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश ऐच्छिक आहे.[१२]

कारागृहातील कैदी दररोज ५००० कपडे तयार करतात. कारागृहात कैद्याच्या पुनर्वसनासाठी नागरिकांसाठी कैद्यान्द्वारे इस्त्री विभाग चालवला जातो, तसेच केशकर्तनालयसुद्धा चालवले जाते.[१०][१३]

संदर्भ

  1. ^ "पुणे : सर्वाधिक मोठय़ा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी". Loksatta. 2017-07-07. 2020-08-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Yerwada Jail in Pune, Yerwada Central Jail Pune | Pune Online". www.puneonline.in. 2020-08-18 रोजी पाहिले.
  3. ^ Roy, Manabendra Nath (2001). The Radical Humanist, Volume 65. p. 23.
  4. ^ "The Indian Express - Google News Archive Search". news.google.com. 2020-08-18 रोजी पाहिले.
  5. ^ Kamath, M. V. (1995). Gandhi's Coolie: Life & Times of Ramkrishna Bajaj (इंग्रजी भाषेत). Allied Publishers. ISBN 978-81-7023-487-6.
  6. ^ Janata - Volume 61. २००६. pp. १७५.
  7. ^ "Archive News". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2020-08-18 रोजी पाहिले.
  8. ^ "देशातील बहुचर्चित स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू" (इंग्रजी भाषेत). 2017-10-26. 2020-08-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ "कसाबला फाशी : घटनाक्रम". Loksatta. 2012-11-21. 2020-08-19 रोजी पाहिले.
  10. ^ a b author/online-lokmat (2020-01-19). "अनेक वर्षानंतर बाहेरील जग पाहायला मिळाले". Lokmat. 2020-08-19 रोजी पाहिले.
  11. ^ "महिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली हिरवीगार". Agrowon - Agriculture Marathi Newspaper. 2020-08-19 रोजी पाहिले.
  12. ^ चटप, दीपक (2019-10-04). "गांधी विचार परीक्षा : कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग". द वायर मराठी (इंग्रजी भाषेत). 2020-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-19 रोजी पाहिले.
  13. ^ "येरवड्यातील कैद्यांनी सुरू केली इस्त्री सेवा अन्... | eSakal". सकाळ. 2020-08-19 रोजी पाहिले.