यूटीसी−०५:०० ही यूटीसीच्या ५ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अमेरिका, कॅनडा देशांमधील पूर्व प्रमाणवेळ तसेच मध्य प्रमाणवेळेची उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच कॅरिबियन व दक्षिण अमेरिकेमधील काही देश ही वेळ वापरतात.